agriculture news in Marathi 1059 crore fund for cci Maharashtra | Agrowon

सीसीआयला केंद्राकडून १०५९ कोटींचा मदतनिधी 

चंद्रकांत जाधव
बुधवार, 1 एप्रिल 2020

कापसाची खरेदी खानदेशात २९ फेब्रुवारीनंतर सीसीआयने बंद केली. पुढे खरेदी सुरू होईल की नाही, हे कोरोनाचे संकट किती दूर होते, यावर अवलंबून आहे. यंदा सीसीआयने कापसाची विक्रमी खरेदी केली आहे. परंतु बाजारातील मंदीमुळे काही अडचणीदेखील आल्या आहेत. 
- अविनाश भालेराव, सीसीआय कापूस खरेदी केंद्रधारक, जळगाव 

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर कापसाची देशभरातील विविध केंद्रांच्या माध्यमातून विक्रमी खरेदी केली आहे. परंतु जागतिक बाजारातील विविध संकटे व ठप्प झालेली उचल यामुळे सीसीआयला वित्तीय फटका बसला असून, यातून सावरण्यासाठी केंद्राने नुकताच सीसीआयला १०५९ कोटी रुपये मदतनिधी मंजूर केला आहे. 

२०११-१२ नंतर सीसीआयने देशात कापसाची विक्रमी खरेदी केली आहे. यंदा बाजारात हमीभावापेक्षा म्हणजेच ५४५० व ५३५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी दर आहेत. दर कमी राहील्याने सीसीआयच्या केंद्रांमध्ये कापसाची आवक अधिकच राहीली. राज्यात विदर्भ, मराठवाडा क्षेत्रात सुमारे ६७ खरेदी केंद्र सीसीसीआयने सुरू केले होते. तसेच पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथेही कापूस खरेदी केली.

यंदा फेब्रवारीअखेरपर्यंत सुमारे ९२ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची खरेदी सीसीआयने देशभरात केली. तर मागील हंगामातील ११ लाख गाठी सीसीआयकडे शिल्लक आहेत. अर्थातच सुमारे १०३ लाख गाठी सीसीआयकडे असून, त्या गोदामांमध्ये आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना विषाणू व इतर संकटांमध्ये मंदी आली. त्यात गाठींची विक्री परवडत नसल्याने सीसीआयने आपला साठा राखून ठेवला. त्यात सीसीआयचे नुकसानही झाले आहे. हे नुकसान भरून निघावे व खरेदीला प्रोत्साहन यासाठी केंद्राने सीसीआयला अनेक वर्षानंतर प्रथमच १०५९ कोटी मदतनिधी मंजूर केला आहे.

सीसीआयकडे केंद्रधारक कारखानदार व शेतकरी यांचे चुकारे थकीत नाहीत. जो निधी थकीत आहे, तो बॅंक पासबूक, आधार क्रमांक आदी तांत्रिक अडचणींमुळे थकल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुन्हा खरेदी शक्‍य 
सीसीआयची खरेदी राज्यात मराठवाडा व इतर भागात २९ फेब्रुवारीनंतर बंद आहे. काही केंद्र प्रशासन व कारखानदार यांच्या समन्वयाने २, ३ मार्चपर्यंत सुरू होते. तेदेखील नंतर बंद झाले. आता कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर ही खरेदी सुरू होवू शकते, अशी माहिती मिळाली. 
 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...