agriculture news in Marathi 10.6 degree temperature in Nagpur Maharashtra | Agrowon

नागपूरात १०.६ अंश तापमान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती निवळल्याने राज्यात पुन्हा थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, गोंदिया, नागपूर तर मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील नागपूर येथे १०.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती निवळल्याने राज्यात पुन्हा थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, गोंदिया, नागपूर तर मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील नागपूर येथे १०.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अरबी समुद्राच्या वायव्येस पवन चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. पुढील एक ते दोन दिवस त्याची तीव्रता राहणार असून, त्याचा ताशी वेग २६ किलो एवढा आहे. हे चक्रीवादळ येमेनमधील सोकोट्रापासून आग्नेयेच्या दिशेला सुमारे ४६० किलोमीटर, तर सोमालियातील बोसासोपासून ५४० किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबई जवळ असलेल्या दुसऱ्या चक्रावाताची स्थिती काही प्रमाणात निवळल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. त्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरुवात झाली आहे.  

मराठवाडा विदर्भात हवामान पूर्णतः कोरडे झाल्याने किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, गोंदिया येथील किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. येथील तापमान १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातही किंचित थंडी वाढली आहे.

उस्मानाबादमध्ये सर्वांत कमी १३.८ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. परभणीतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानाची तीव्रता कमी झाल्याने थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये १४.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.

मध्य महाराष्ट्रात १४ ते १८ अंश सेल्सिअस तर, खानदेशात १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. कोकणातही हवामान कोरडे असल्याने किमान तापमानात किंचित घट झाली असून, थंडीने फारसा जोर धरलेला नाही.  

शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः
नगर १६.६ (४), अकोला १३.६ (-१), अलिबाग २३.५ (४), अमरावती १४.४(-२), औरंगाबाद १४.७ (२), बीड १७.३ (४), बुलडाणा १४.४ (-१), चंद्रपूर १४.०, डहाणू २३.७ (४), गोंदिया ११.८ (-२), जळगाव १७.० (४), कोल्हापूर २०.४, महाबळेश्वर १४.२, मालेगाव १७.८ (५), मुंबई २२.६ (३), नागपूर १०.६(-३), नांदेड १५.० (१), नाशिक १८.६ (७), उस्मानाबाद १३.८, परभणी १४.० (-१), लोहगाव १९.४ (७), पुणे १७.९ (५), रत्नागिरी २३.४ (२), सांगली २०.४ (५), सातारा १८.९ (४), सोलापूर १९.१ (३), ठाणे २३.०, वर्धा १३.९ (१), यवतमाळ १३.९ (१),
 


इतर अॅग्रो विशेष
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...
‘तारीख पे तारीख’ किती दिवस?देशाचे पंतप्रधान दमदार भाषणात जनतेला आश्‍वासन...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....