agriculture news in Marathi, 107 TMC Water release from Koyna, Maharashtra | Agrowon

कोयना धरणातून १०७ टीएमसी विनावापर पाण्याचा विसर्ग

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

सातारा ः जिल्ह्यासह कोयना धरणात विक्रमी पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. यामुळे कोयना धरणासह सर्वच प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आजपर्यंत एकट्या कोयना धरणाच्या दरवाजातून १०७ टीएमसी म्हणजेच धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी विनावापर नदीपात्रात सोडण्यात आले आहे. 

सातारा ः जिल्ह्यासह कोयना धरणात विक्रमी पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. यामुळे कोयना धरणासह सर्वच प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आजपर्यंत एकट्या कोयना धरणाच्या दरवाजातून १०७ टीएमसी म्हणजेच धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी विनावापर नदीपात्रात सोडण्यात आले आहे. 

मॉन्सून लांबल्याने जिल्ह्यातील धरणे भरणार की नाही अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. प्रामुख्याने जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. कमी कालवधीत जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. पावसास विलंब झाल्याने धरणे भरण्यास प्राधान्य दिले. यामुळे पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन करताना धरण व्यवस्थापनास तारेवरची कसरत करावी लागली. या दरम्यान संततधार पाऊस सुरू राहिल्याने पाण्याचा विसर्ग सूर करावा लागला होता. 

पाण्याची आवक व धरणाची क्षमता यामध्ये मेळ घालण्यासाठी पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे धरणाचे दरवाजे १४ फुटापर्यंत उचलून लाखावर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवावा लागला होता. यामुळे कोयना, कृष्णा नद्यांना पूर आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कोयना धरणात पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून या क्षमतेच्या दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजे २११.४३ टीएमसी पाण्याची आवक आजपर्यंत झाली आहे.

धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आतापर्यंत १०७.१६ टीएमसी पाणीसाठा सोडावे लागले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ६६७१ मिलिमीटर नवजा येथे ७७६६ मिलिमीटर महाबळेश्वर येथे ६७१० मिलिमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. सध्या धरणात एकूण १०४.९५ टीएमसी म्हणजेच ९९.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

विसर्ग सुरूच 
मागील आठ ते दहा दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी जास्त होत आहे. यामुळे विसर्ग कमी जास्त केला जात आहे. काही दिवसांसाठी हा विसर्ग पूर्णपणे बंदही करण्यात आला होता. मंगळवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद केले होते. पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग होता. मात्र, सांयकाळी पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता धरणाचे दरवाजे दोन फूट उचलून २० हजार ५३२ क्युसेक केला जात आहे. बुधवारी सकाळी दहापर्यंत हा विसर्ग कायम होता.


इतर बातम्या
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
चिखलगावच्या जिनिंगमध्ये कापसाला भीषण आग...अकोला ः येथील पातूर मार्गावर चिखलगाव जवळ असलेल्या...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
सांगा साहेब, खरीप कसा पेरू? शेतकऱ्याने...नाशिक : मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीची...
जैविक शेती मिशनद्वारे यूट्यूब चॅनलच्या...अमरावती ः कमी खर्चाच्या जैविक शेतीला प्रोत्साहन...
म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची...सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा...
बुलडाण्यात पीकविमा बचत खात्यात जमा...बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा...
समृद्धी महामार्गाच्या धुळीमुळे नुकसान...कारंजालाड, जि. वाशीम : समृद्धी महामार्गाच्या...
मका पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढवा ः...बुलडाणा ः शासनाने यावर्षी पाऊस चांगला असताना...
अमरावती : पीककर्जाच्या व्याज माफीचा...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
जळगावात ज्वारी खरेदीसाठी स्वस्त धान्य...जळगाव : जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणुकीसाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जासाठी ऑनलाइन मागणी...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या...
केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...नाशिक : केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर...
परभणीत उद्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी परभणी  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जालना जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील...जालना : जिल्ह्यातील विविध बाजार समितींकडे...
घाटंजीत ४३ हजार हेक्‍टरवर कापूस...यवतमाळ ः घाटंजी तालुका कृषी विभागाने यावर्षी...
परभणी जिल्ह्यात पावणे तीन कोटींचा निधी...परभणी : वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास...
नांदेडचा फलोत्पादनाचा ८ कोटी ४२...नांदेड : एकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गंत...
पिकांचे अवशेष, ऊस पाचटाचे व्यवस्थापन... नगर  : कोरडवाहू शेतीत तीन वर्षांतून...
नगर जिल्ह्यात ‘रोहयो’ची अडीच हजार कामे...नगर  ः मागेल त्याला काम देण्यासाठी...