agriculture news in Marathi 107 vacancies in Sindhudurg district agriculture department Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे रिक्त

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी तब्बल १०७ पदे रिक्त आहे. यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांची ६ पदाचा समावेश आहे. त्यामुळे न पेलवणारा भार तालुका अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. कृषी विभागातील रिक्त पदामुळे शासनाच्या विविध कृषी आणि कृषिपूरक योजना पुरविणारी यंत्रणाच कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे.

सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी तब्बल १०७ पदे रिक्त आहे. यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांची ६ पदाचा समावेश आहे. त्यामुळे न पेलवणारा भार तालुका अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. कृषी विभागातील रिक्त पदामुळे शासनाच्या विविध कृषी आणि कृषिपूरक योजना पुरविणारी यंत्रणाच कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्याचा कृषी विभाग सध्या रिक्त पदामुळे हैराण झाला आहे. जिल्ह्यातील १०७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधीक्षक पद देखील रिक्त आहे. याशिवाय ८ तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी दोन पदे भरलेली आहेत. रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे दिला जात असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांसह कीडरोग नियत्रंण, नियोजनबद्ध विविध पिकांची लागवड करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना मदत होत असते. जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे काजू, आंबा, पिकांसह अन्य पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असते.

परंतु कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार कोण हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावागावातील शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याचे काम कृषी सहाय्यक करीत असतात. परंतु जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची ५२ पदे रिक्त आहेत. तर कृषी पर्यवेक्षकांची २४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही ससेहोलपट आहे.

सिंधुदुर्गात कृषी विभागाच्या योजनांसह चांदा ते बांदा या योजनेतून कृषी आणि कृषी संलग्न योजना राबविल्या जात आहेत.परंतु अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे ही योजना राबविण्यात देखील अडचणी येत आहेत.

वर्गनिहाय रिक्त पदे

पदनाम  मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पद
जिल्हा कृषी अधीक्षक  १    ०   १
तालुका कृषी अधिकारी ८   ६   २
कृषी अधिकारी १२   १    ११
मंडलकृषी अधिकारी  १९   ६   १३    
कृषी पर्यवेक्षक ५६   ३२     २४  
 कृषी सहाय्यक २४९   १९७   ५

 


इतर अॅग्रो विशेष
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...