मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रो विशेष
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९ साखर कारखान्यांनी १३१ लाख टन ऊस गाळला आहे. यामुळे १०९ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९ साखर कारखान्यांनी १३१ लाख टन ऊस गाळला आहे. यामुळे १०९ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
गेल्या हंगामात ७९ सहकारी व ६८ खासगी कारखान्यांना ८.२२ लाख हेक्टरवरील ५४५.२६ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यापासून ६६.६१ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा आतापर्यंत ७९ सहकारी व ७० खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. ‘‘अपेक्षेप्रमाणे २३ नोव्हेंबरपर्यंत कोल्हापुरात ३३ व सोलापूर विभागात ३० कारखाने वेगाने गाळप करीत आहेत. आत्तापर्यंत २६.६९ लाख टन उसापासून कोल्हापूरला २५.४९ लाख क्विंटल साखर तर २८.४१ लाख टन ऊस गाळून सोलापूर विभागाने २२.१९ लाख क्विंटल साखर तयार केली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
अवर्षणग्रस्त मराठवाडा विभागात यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे औरंगाबाद विभागात १० कारखान्यांनी आत्तापर्यंत १३.०८ लाख टन उसाची खरेदी शेतकऱ्यांकडून केली आहे. त्याचे गाळप करून ९ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. नांदेड विभागात आठ कारखान्यांनी ७.२६ लाख टन उसापासून ५.१२ लाख क्विंटल साखर तयार केली आहे.
सर्वांत कमी उतारा औरंगाबादचा
राज्यातील कारखान्यांचा आत्तापर्यंतचा एकूण साखर उतारा ८.३४ टक्के इतका नोंदविला आहे. उतारा जादा असल्यास साखर उत्पादन वाढते. मात्र, हंगामाच्या सुरूवातीला उतारा कमीच मिळतो. सध्या कोल्हापूरचा उतारा सर्वात जास्त ९.५५ टक्के असून सर्वात कमी उतारा औरंगाबाद विभागातील कारखान्यांचा असून तो अवघा ६.९६ टक्के आहे.
प्रतिक्रिया
साखर कारखान्यांमधील गाळप प्रक्रिया डिसेंबरपासून वेग घेण्याची चिन्हे आहेत. कारण, आयुक्तालयाने गेल्या आठवड्यात अजून काही कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळणे, साखर उत्पादन मर्यादित ठेवणे आणि इथेनॉल उत्पादन वाढविणे, असे नियोजन यंदा कारखान्यांनी केले आहे. या नियोजनाला अनुकूल ठरणारी स्थिती सध्या दिसते आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त
- 1 of 653
- ››