पुणे जिल्ह्यात फलोत्पादन अभियानासाठी १३ हजार ७८९ अर्ज पात्र

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकांच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातून यासाठी १४  हजार ३२५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ हजार ७८९ अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या अर्जदारांना अभियानातील घटकांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर उद्या (ता. ३) सोडत काढण्यात येणार आहे. या वेळी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१८-१९ मध्ये राबविण्यात येत आहे. यातून सुमारे २९ विविध योजनांच्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. गेल्या वर्षीपासून लाभार्थी निवडण्यासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. यंदाही आॅनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी २० जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने अनेक शेतकरी शेतीकामात गुंतले होते. तसेच ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेतील अडचणी, आॅनलाइनमधील त्रुटी अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यास वेळ लागत होता. परिणामी अनेक शेतकरी या अभियानातील घटाकापासून वंचित राहणार होते. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेत या योजनेसाठी अर्ज करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

तालुका पातळीवर आलेल्या या अर्जांची छाननी केली असून, ५३९ अर्ज अपात्र ठरले आहेत.   यंदा या योजनेअंतर्गत हरितगृह, शेडनेट, शेततळे अस्तरीकरण, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, ट्रॅकर, पाॅवर टिलर, शीतगृह, रायपनिग चेंबर, रेफर व्हॅन, पीक संरक्षण साहित्य, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ उभारणी, मधुमक्षिकापालन या घटकाकरिता अनुदान दिले जाणार आहे. तसेच सामूहिक शेततळे या घटकाकरिता फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना या घटकाअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com