'कोयना'तून १९ हजार ५८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग

कोयना धरण
कोयना धरण

सातारा: कोयना धरणातून शनिवारी दुपारी एक वाजता सहा वक्र दरवाज्यातून १९ हजार ५८० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. तसेच, पायथा वीजगृहातून सुरू असलेला २१०० क्युसेक विसर्ग धरून कोयना धरणातून एकूण विसर्ग १३५२७ क्युसेक नदीपात्रात केला जात आहे. विसर्ग पाण्याची आवक व पावसाची तीव्रता पाहून कमी किंवा जास्त करणेत येईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणात प्रतिसेकंद ६४,४०० क्युसेक पाण्याची आवक असल्याने पाणीसाठा नियंत्रित राहाण्यासाठी धरण पाणी दरवाजातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना धरणात शनिवारी दुपारी एक वाजता पाणीसाठा ८९ टीएमसी  झाला आहे.  कोयना धरणाची सकाळी ६ वाजेची स्थिती... ■ पाणीसाठा 93.87 tmc  ■ पाऊस mm  : कोयना 179, नवजा 182, महाबळेश्वर- 228 ■ एकूण विसर्ग 19580 cusecs ■ आवक 94000 cusecs ■ सकाळी 9.00 वाजता विसर्गात वाढ होणार आहे. ■ 6 वक्रद्वारे साडेसहा फूट उचलून सांडव्यावरून 39036 cusecs व विजगृहातून 2100 cusecs असा एकूण विसर्ग 41136 cusecs असेल. ■त्यानंतर पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी जास्त होईल , त्या बाबत आगाऊ सूचना देण्यात येतील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com