agriculture news in Marathi 11 lac application pending of PM-Kisan Maharashtra | Agrowon

‘पीएम-किसान’ योजनेचे अकरा लाख अर्ज पडून

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

 पंतप्रधान किसान सन्मान योजनेत (पीएम-किसान) अर्ज केलेल्या ११ लाख शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्रुटी दूर न केल्याने पडून आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पुणे: पंतप्रधान किसान सन्मान योजनेत (पीएम-किसान) अर्ज केलेल्या ११ लाख शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्रुटी दूर न केल्याने पडून आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.  

केंद्र शासनाने जुलैअखेरचा पाचवा हप्ता जमा केला आहे. यामुळे ऐन लॉकडाउनमध्ये ३३ लाख ८९ हजार शेतकऱ्यांच्या हाती ६ हजार ७८४ कोटी रुपये आले आहेत. मात्र, त्रुटी दूर न झालेल्या शेतकऱ्यांना हाती पैसा असूनही केंद्र शासनाला देता आलेला नाही. 

प्रलंबित असलेल्या या अर्जांबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच आढावा घेतला. पाच ऑगस्टपर्यंत मोहीम राबवून अर्ज निकाली काढावेत, अशा सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. 

‘‘या त्रुटी दूर करण्याची जबाबदारी महसूल खाते, कृषी खाते तसेच केंद्र शासनाच्या यंत्रणांची आहे. त्यांच्याशी शेतकऱ्यांचा संबंध नाही. तथापि, मोहिमेत त्रुटी विचारण्यासाठी कर्मचारी आल्यास शेतकऱ्यांनी माहिती द्यावी,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 
दरम्यान, समूह माध्यमातून ‘‘पीएम-किसान’ योजनेची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पाच ऑगस्टपर्यंतच अर्ज भरता येईल,’’ असे संदेश फिरत आहेत.

मात्र, अशी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. अर्ज करून देखील लाभ मिळत नसल्यास शेतकरी याबाबत ‘पीएम-किसान’ सन्मान समितीकडे चौकशी करू शकतात. ही समिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करते. 

कृषी विभागाच्या पुढाकारातून आत्तापर्यंत एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. त्यातील ३३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा पाचवा हप्ता मिळाला. प्रतिशेतकरी दोन हजाराची रक्कम बॅंकेत जमा देखील  करण्यात आली.

महाराष्ट्रात अभियान रखडले
प्रतिवर्षी सहा हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी नोंदणी अभियान केंद्रीय कृषी मंत्रालयाने चालविले आहे. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अभियान रखडले. अभियानाबाबत महसूल विभाग आणि केसीसी वाढविण्याबाबत बॅंका दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे शेतकरी त्यांच्या लाभापासून वंचित आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...