अहिल्यादेवी होळकर योजनेतून रत्नागिरीत ११ नवीन रोपवाटिका

रत्नागिरी : रोपवाटीकांच्या माध्यमातून भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकासअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
11 new nurseries in Ratnagiri under Ahilya Devi Holkar scheme
11 new nurseries in Ratnagiri under Ahilya Devi Holkar scheme

रत्नागिरी : रोपवाटीकांच्या माध्यमातून भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकासअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. जिल्ह्यात ११ नवीन रोपवाटिका सुरु करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात एक रोपवाटिकेचे लक्ष निश्‍चित केले आहे.

मागील २ ते ३ वर्षांपासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाण्यांच्या चांगल्या जाती व चांगली रोपांची मागणी आहे. प्रत्येक तालुक्यात दर्जेदार कीड व रोग मुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यात येणार आहेत.

भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पीक रचनेत बदल घडवून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे, असा उद्देश आहे.

शासनाचा लाभ घेतलेले खासगी रोपवाटीकाधारक, शासनाच्या लाभ न घेता खासगी रोपवाटिकाधारक शेतकरी, राष्ट्रीय कृषि विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनातून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुन्हा पात्र राहणार नाहीत. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आदी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करण्यात येईल. 

यामध्ये शेडनेट, प्लास्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर आणि प्लास्टिक के्रटस् मिळून ४ लाख ६० हजार रुपये प्रकल्प खर्च येतो. त्यातील २ लाख ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. ४० गुंठे जमिनीवर ही रोपवाटिका उभारायची आहे. जिल्ह्याला ११ रोपवाटिकांचे लक्ष आहे. प्रत्येक तालुक्यात एक अशा नऊ रोपवाटिका उभारण्यात येतील. 

हे लाभार्थी पात्र ठरु शकतात

लाभार्थी निवड करताना अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान चाळीस गुंठे जमीन अपेक्षित आहे. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय आवश्यक, महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com