खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्ग

धरण साखळीत बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी सकाळी खडकवासला धरणातील येवा ५ हजार क्युसेक पर्यंत वाढला. परिणामी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विसर्ग ११ हजार ७३५ क्युसेक पर्यंत वाढविला आहे.
11 thousand 735 cusecs discharged from Khadakwasla
11 thousand 735 cusecs discharged from Khadakwasla

पुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून मुठा नदीत सोडण्यात येत आहे. धरण साखळीत बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी सकाळी खडकवासला धरणातील येवा ५ हजार क्युसेक पर्यंत वाढला. परिणामी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विसर्ग ११ हजार ७३५ क्युसेक पर्यंत वाढविला आहे.

पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे धरणांतील पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरूवारी (ता. १३) जिल्ह्यातील खडकवासला, कळमोडी आणि वीर या तीन धरणांतून पाण्याचा विसर्ग मुळा, भीमा, नीरा नदीत सोडण्यात आला होता.

धरण साखळीतील पानशेत वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणात बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. संध्याकाळी पाच वाजता खडकवासला येथे ५ पानशेत येथे २२, वरसगाव २०, टेमघर येथे २५ मिलिमीटर पाऊस झाला होता. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. परिणामी आज सकाळी सहा वाजता मागील २४ तासांत खडकवासला येथे १२ पानशेत येथे ६६, वरसगाव ६२, टेमघर येथे ७५ मिलिमीटर पाऊस झाला. चार ही धरणांत मिळून १९.४१ टीएमसी म्हणजे ६६.५८ टक्के आहे.

वीर धरणातून गुरूवारी (ता. १३) संध्याकाळी पाच वाजता विसर्ग वाढवून २३ हजार १२० क्युसेक करण्यात आला आहे. पावसामुळे खडकवासला धरणातील येवा एक हजार क्युसेकहून वाढून पाच हजार क्युसेक पेक्षा जास्त झाला आहे. म्हणून धरणातून विसर्ग देखील वाढविला. खडकवासला धरणातील विसर्ग काल सकाळी ४२८ क्युसेक केला. संध्याकाळी सहा वाजता ८५६ क्युसेक सोडला होता. आज सकाळी १७१२ क्युसेक केला सात वाजता ३४२४, आठ वाजता ५१३६ क्युसेक  केला आहे.

दरम्यान बुधवारी दहा वाजता १०० टक्के भरल्यानंतर एक दरवाजा अर्ध्या फुटाने उघडून ४२८ क्युसेक विसर्ग मुठा नदीत सोडला. उपअभियंता वामन भालेराव व त्यांच्या पत्नी कल्पना भालेराव यांच्या हस्ते जलदेवतेचे साडी- चोळी अर्पण करून जलपूजन करण्यात आले. यावेळी, कर्मचारी कांचन मते, धोंडिभाऊ भागवत, वसंत ठाकर, प्रमोद रायकर उपस्थित होते.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. गुरूवारी वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९१ मिलिमीटर पाऊस पडला. तर मुळशी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात ७८, टेमघर ७५, पवना ६८, पानशेत ६६, वरसगाव ६२, गुंजवणी ६०, कळमोडी ३७, आंध्रा ३५, भामाआसखेड २७, कासारसाई २२, माणिकडोह २३, डिंभे २१, पिंपळगाव जोगे २१, नीरा देवघर ३८ चासकमान १८, भाटघर १८, खडकवासला १२, नाझरे सहा, वीर पाच मिलिमीटर पाऊस झाला आहे.

धरणांमधील पाणीसाठा स्थिती (टीएमसीमध्ये)
धरण एकूण क्षमता  उपयुक्त साठा टक्केवारी
खडकवासला १.९७ १.९७ १००
पानशेत १०.६५ ८.१५ ७६.५८
वरसगाव १२.८३ ८.०७ ६२.९७
टेमघर ३.७१ १.८४ ४९.५०
एकूण २९.१५ २०.०४ ६८.७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com