परभणी, हिंगोली, नांदेडातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना ११० कोटींचा निधी

चक्रीवादळातीलशेतीपिकांच्या नुकसानीपोटी अद्याप अनुदान वाटप शिल्लक राहिले होते. म्हणून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी ११० कोटी ९७ लाख ८३ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला.
 110 crore fund for cyclone victims in Parbhani, Hingoli, Nanded districts
110 crore fund for cyclone victims in Parbhani, Hingoli, Nanded districts

परभणी : गतवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्री वादळांमुळे अवेळी पाऊस झाला. त्यातील शेतीपिकांच्या नुकसानीपोटी अद्याप अनुदान वाटप शिल्लक राहिले होते. म्हणून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी ११० कोटी ९७ लाख ८३ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी तालुक्यांकडे निधी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अवेळी पावसामुळे सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी शेतीपीकांसह बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यात शेती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये अर्थसहाय्य दर आहेत. दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देय आहे. यापूर्वी दोन टप्प्यात प्राप्त झालेल्या निधीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. परंतु, या तीन जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना निधीअभावी अनुदान मिळाले नव्हते. शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने निधी वितरित केला आहे.

नुकत्याच प्राप्त झालेल्या ३९ कोटी ५९ लाख ४ हजार रुपये निधीतून परभणी तालुक्यातील ८ गावतील ७ हजार ९२५ शेतकऱ्यांना ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपये, जिंतूरमधील २० गावांतील १० हजार ९७१ शेतकऱ्यांना १० कोटी ५४ लाख रुपये, सेलूतील ४ गावांतील ४ हजार ६४७ शेतकऱ्यांना ३ कोटी ३५ लाख ९६ हजार रुपये, मानवतमधील २ गावातील ३ हजार १६० शेतकऱ्यांना ३ कोटी ३७ लाख ६१ हजार रुपये, पाथरीतील ५ गावातील ३ हजार ८४६ शेतकऱ्यांना ३ कोटी ४४ लाख ३० हजार रुपये, सोनपेठमधील ४ गावातील २ हजार ६६५ शेतकऱ्यांना २ कोटी ६५ लाख ७ हजार रुपये, गंगाखेडमधील ९ गावातील ३ हजार ९०९ शेतकऱ्यांना ३ कोटी १० लाख रुपये, पालममधील ४ गावांतील ३ हजार ५६९ शेतकऱ्यांना २ कोटी ९० लाख २३ हजार रुपये, पूर्णा तालुक्यातील ४ गावातील ४ हजार ७ शेतकऱ्यांना ३ कोटी ४६ लाख  ६३ हजार रुपये निधीचे वाटप होईल.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यासाठी निधी १ कोटी ४२ लाख ८४ हजार २८० रुपये, अर्धापूर ५५ लाख ९८ हजार २४५ रुपये, मुदखेड साठी ३ कोटी ४५ लाख ५५ हजार २०८ रुपये, कंधार ४ कोटी ६६ लाख ६१ हजार १३२ रुपये, लोहा ८ कोटी ७५ लाख रुपये, देगलूर ६ कोटी ४५ लाख १३ हजार २२४ रुपये, मुखेड  ४ कोटी १६ लाख ४० हजार ७३५ रुपये, नायगाव ३ कोटी ८१ हजार ९ रुपये, बिलोली २ कोटी ३५ लाख २० हजार ३३६ रुपये, धर्माबाद १ कोटी १८ लाख ८५ हजार १२१ रुपये, किनवट २ कोटी ६२ लाख ४२ हजार ७५५ रुपये, माहूर १ कोटी ४५ लाख १३ हजार २२४ रुपये, हिमायतनगर २ कोटी १ लाख ५३ हजार ६ रुपये, हदगाव ४ कोटी २८ लाख ५४ हजार ६२७ रुपये, भोकर २ कोटी ४१ लाख ६९ हजार २१६ रुपये, उमरी १ कोटी ८३ लाख ७६ हजार ८८२ रुपये निधी वितरित केला जाईल.

निधीअभावी रखडले होते अनुदान

नांदेड जिल्ह्यासाठी ५० कोटी ६५ लाख ४९ हजार रुपये, परभणीसाठी ३९ कोटी ५९ लाख ४ हजार रुपये, हिंगोलीसाठी २० कोटी ७५ लाख ३० हजार रुपये एवढा निधी देण्यात आला. परभणी जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ३९६ शेतकऱ्यांना आजवर ३४० कोटी ५१ लाख ५७ हजार रुपये निधीचे वाटप करण्यात आले. परंतु निधीअभावी ६० गावांतील ४४ हजार ६९९ शेतकरी शिल्लक राहिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com