देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज

chana
chana

नवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. २०१९-२० च्या हंगामात देशात ११० लाख टन हरभरा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हरभरा पिकाखालील वाढलेले क्षेत्र आणि पोषक वातावरणामुळे वाढलेली उत्पादकता, यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. गेल्या वर्षी देशात १०१ लाख टन हरभरा उत्पादन झाले होते, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली.   ‘‘देशात रब्बी हंगामात पोषक वातावण आणि सरकारने वाढविलेला हमीभाव यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला पसंती दिली. देशात हरभरा उत्पादनात अग्रेसर असलेल्या राजस्थान आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये उत्पादकतेत वाढ झाल्याने यंदा उत्पादनवाढीची शक्यता आहे,’’ अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.  केंद्र सरकारने २०२०-२१ च्या हंगामात हरभऱ्यासाठी चार हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. केल्या वर्षी हमीभाव ४ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटल होता. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात जानेवारीच्या शेवटपर्यंत हरभरा लागवड सुरू होती. परतीच्या पावसाने देशात जास्त वेळ मुक्‍काम केल्याने रब्बी पेरणीस विलंब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांची कमी पेरणी करून हरभऱ्याला पसंती दिली आहे. देशात यंदा हरभरा पिकाखालील क्षेत्र तब्बल १२ टक्क्यांनी वाढले आहे.  राजस्थानमध्ये हरभरा पेरणीत ४२ टक्के वाढ झाली आहे, तर महाराष्ट्रात ६६ टक्के पेरणी वाढली आहे. मात्र, देशात हरभरा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या मध्य प्रदेशात हरभरा पेरणीत २० टक्के घट झाली आहे. देशात पेरणीत झालेली वाढ आणि राजस्थान व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये उत्पादकतेत वाढ झाल्याने उत्पादनवाढीची शक्यता आहे. उत्पादकतेवर वाढत्या उष्णतेचा परिणाम शक्य यंदा हरभरा उत्पादकतेत वाढ होण्याची शक्यता असली, तरी सध्या दुपारच्या वेळी अपेक्षेपेक्षा जास्त वाढणाऱ्या उष्णतेचा उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशात बऱ्याच भागांत यंदा उशिरा पेरण्या झाल्याने वाढत्या तापमानामुळे उत्पादकतेत घट होण्याची भीती आहे. असे झाल्यास देशातील उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ज्या भागांत तापमान जास्त आहे, त्या भागांत प्रतिहेक्टरी उत्पादकता १२ ते १५ क्विंटल राहण्याची शक्यता आहे, तर ज्या भागांत तापमान सरासरी आहे तेथे १७ ते २५ क्विंटल उत्पादकता राहण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com