Agriculture news in marathi 110 small to medium projects dry in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ११० लघू-मध्यम प्रकल्प कोरडे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यातील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. ८७३ प्रकल्पांमध्ये केवळ ४१ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. लघु - मध्यम मिळून ११० प्रकल्प कोरडेठाक आहेत. दुसरीकडे १९७ लघु-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यातील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. ८७३ प्रकल्पांमध्ये केवळ ४१ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. लघु - मध्यम मिळून ११० प्रकल्प कोरडेठाक आहेत. दुसरीकडे १९७ लघु-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

मराठवाड्यातील सर्वाधिक संख्येने असलेल्या ७४९ लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठ्याची अवस्था दयनीय आहे. या प्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्के उपयुक्त पाणी आहे. त्यापाठोपाठ ७५ मध्यम प्रकल्पांतही २६ टक्केच उपयुक्त पाणी आहे. अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी मांजरा, निम्न दुधना, सिना कोळेगाव या तीनही प्रकल्पांत उपयुक्त पाणी नाही. दुसरीकडे निम्न तेरणा प्रकल्पात केवळ १४ टक्के, तर विष्णुपुरीतही २८ टक्के उपयुक्त पाणी आहे. 

जायकवाडीत ६० टक्के, सिद्धेश्वर ६३, येलदरी ७३, उर्ध्व पेनगंगा ४९, निम्न मनारमध्ये ५९ टक्के पाणी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघु प्रकल्पांत उपयुक्त पाणी नाही. जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्‍ंपात ११ टक्के, बीड जिल्ह्यातील १२६ लघु प्रकल्‍पात २१ टक्‍के, लातूर जिल्ह्यातील १३२ लघु प्रकल्‍पात २३, उस्मानाबादमधील २०५ लघु प्रकल्प ११ टक्के, नांदेडमधील ८८ लघु प्रकल्पांत ३४ टक्के, परभणीतील २२ लघु प्रकल्ं‍पात २०, हिंगोलीतील २६ लघु प्रकल्पांत २६ टक्के उपयुक्त पाणी आहे. 

मध्यम प्रकल्पांची अवस्थाही नांदेड जिल्हा वगळता फारशी समाधानकारक नाही. औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत २३ टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पांत १७ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ३० टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ११ टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत १९ टक्के, परभणीतील २ प्रकल्पांत ४४ टक्के, तर नांदेडमधील ९ मध्‍यम प्रकल्ं‍पात ५३ टक्के उपयुक्त पाणी आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. 

तीन जिल्ह्यांतील ८ मध्यम प्रकल्प कोरडे 

कोरड्या ८ मध्यम प्रकल्पांत औरंगाबाद, लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी २, तर बीड जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. कोरड्या पडलेल्या १०२ लघु प्रकल्‍पांत औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी २८, जालन्यातील १२, लातूरमधील १५ व उस्मानाबादमधील १९ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखालील मध्यम प्रकल्पांत औरंगाबादमधील ३, जालना व लातूरमधील प्रत्येकी २, बीडमधील ४ व उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...