Agriculture news in Marathi 110 Vegetable and Fruit sales centers in Akola | Agrowon

अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११० विक्री केंद्र

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना ताजा भाजीपाला मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गट, कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात गटांनी सुमारे १७० टनांपेक्षा अधिक भाजीपाला व फळांची विक्री केली आहे. दररोज या परिस्‍थितीत सुधारणा होत आहे. भाजीपाला व फळ विक्री करताना योग्य ती काळजीही घेतली जात आहे. जिल्ह्यात ५४ गटांमार्फत ११० ठिकाणी विक्री केंद्र उघडण्यात आली आहेत.

अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना ताजा भाजीपाला मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गट, कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात गटांनी सुमारे १७० टनांपेक्षा अधिक भाजीपाला व फळांची विक्री केली आहे. दररोज या परिस्‍थितीत सुधारणा होत आहे. भाजीपाला व फळ विक्री करताना योग्य ती काळजीही घेतली जात आहे. जिल्ह्यात ५४ गटांमार्फत ११० ठिकाणी विक्री केंद्र उघडण्यात आली आहेत.

शेतमाल व जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी साडेसहाशे पेक्षा अधिक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भाजीपाला व फळांची वाहतूक काहीशी सुकर झाली आहे. गट व शेतकरी कंपन्यांनी १७० टनांपेक्षा अधिक विक्री केली आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. सोबतच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाटपावर, उपलब्धतेवर मोठा परिणाम सुरुवातीच्या टप्प्यात झाला होता. भाजीपाला, फळे मिळणे अवघड झाले होते. परंतु कृषी विभागाने पुढाकार घेत भाजीपाला व फळे विक्रीसाठी गट व शेतकरी कंपन्यांच्या सहकार्याने विक्रीची साखळी निर्माण केली. 

जिल्ह्यात आता ५२  गट, शेतकरी कंपन्यांनी विपणन व्यवस्थेत सहभाग घेतला. प्रत्येक तालुक्यात थेट विक्री सुरू करण्यात आली. ११० ठिकाणे यासाठी निश्‍चित करण्यात आली आहेत. प्रामुख्याने अकोला उपविभागात अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत तर अकोट उपविभागातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर या चार तालुक्यात शेतमालाची विक्री केली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...