सन्मान योजनेच्या लाभापासून मूरगुडमधील ११०० शेतकरी वंचित

सन्मान योजनेच्या लाभापासून मूरगुडमधील ११०० शेतकरी वंचित
सन्मान योजनेच्या लाभापासून मूरगुडमधील ११०० शेतकरी वंचित

कोल्हापूर : ऑनलाइन यंत्रणेमध्ये त्रुटी असल्यामुळे मूरगुडमधील सुमारे ११०० शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या यंत्रणेत तातडीने सुधारणा करावी आणि या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा, अन्यथा २६ जानेवारीला धरणे आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी कागल तहसीलदारांना दिला आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभागासाठी शेतकऱ्यांनी मुरगूड तलाठी ऑफिसमध्ये फॉर्म दिले होते. मात्र, तलाठ्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यामुळे येथील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. योजनेसंदर्भात माहिती विचारल्यास ऑनलाइन फॉर्म भरा व दुरुस्ती करा, असे सांगितले जाते. पण हे काम तलाठ्यांचे आहे. तरीही अनेक शेतकरी फॉर्ममधील चुकीची ऑनलाइन दुरुस्ती करण्यासाठी सेवा केंद्रात गेले असता ऑनलाइन यंत्रणेमध्ये मुरगूड या गावाचा उल्लेखच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील सर्व शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून मुरगूडमधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. मुरगूडमधील सर्व शेतकऱ्यांचे फॉर्म तलाठ्यांनी ८ दिवसांमध्ये भरून घेत त्याबाबतची ऑनलाइन यंत्रणेमार्फत पूर्तता करावी आणि वंचित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देऊन पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने समीर गोरूले, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, अनिल पाटील, बाळकृष्ण पाटील, नामदेव पाटील, तुकाराम पुजारी यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देखील दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com