मंगळवेढा सूतगिरणीवर लाळे गटाचे एकहाती वर्चस्व

मंगळवेढा सूतगिरणीवर लाळे गटाचे एकहाती वर्चस्व
मंगळवेढा सूतगिरणीवर लाळे गटाचे एकहाती वर्चस्व

मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा तालुका सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी दत्तात्रय लाळे यांच्या गटाने १७ पैकी १४ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत विरोधी गट आवताडे गटाच्या पॅनेलचा धुव्वा उडविला. निवडणूक जरी सूतगिरणीची असली तरी आमदार भालके समर्थकांना भविष्यासाठी हा निकाल दिलासादायक ठरला.

तालुक्‍यातील नऊ मतदान केंद्रांवर १४ जागांसाठी सरासरी ७२ टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हाळाप्पा शिंदे यांच्या अधिकाराखाली शिशुविहार येथे मतमोजणी करण्यात आली. मतदानापूर्वीच तीन जागा आवताडे गटाला मिळाल्या होत्या. बिगर कापूस उत्पादक मतदारसंघातून बबनराव आवताडे, सिद्धेश्‍वर आवताडे, दिलीप सावंत हे बिनविरोध निवडले होते.

बंडू लाळे यांनी २३ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेवर लाळे गटाचेच वर्चस्व होते. यंदा पहिल्यांदाच निवडणूक लागली. निकालानंतर लाळे गटाने शहरात आतषबाजी केली. विजयी उमेदवारांचा व्यंकट भालके यांच्या हस्ते तर प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात संचालक औदुंबर वाडदेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com