कर्जमुक्ती योजनेतून बुलडाण्यात ११२१ कोटींचा लाभ ः डॉ. शिंगणे

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ५९६ लाभार्थी शेतकऱ्यांना ११२१ कोटी रुपयांचा लाभ देत ही रक्कम थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
1121 crore benefit Buldana from debt relief scheme: Dr. Shingne
1121 crore benefit Buldana from debt relief scheme: Dr. Shingne

बुलडाणा : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ५९६ लाभार्थी शेतकऱ्यांना ११२१ कोटी रुपयांचा लाभ देत ही रक्कम थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात डॉ. शिंगणे बोलत होते. या वेळी आमदार श्‍वेताताई महाले, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, माजी आमदार विजयराज शिंदे, राहुल बोंद्रे, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.

 या कार्यक्रमात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण डॉ. शिंगणे यांच्या हस्ते झाले. यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या आई वीरमाता श्रीमती जिजाबाई भिकमसिंह राजपूत,  चोरपांग्रा (ता. लोणार) येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी श्रीमती वंदना राठोड व वीरमाता सावित्रीबाई राठोड यांना प्रत्येकी प्रति कुटुंबीय ४० लाख रुपये निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

तसेच शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या वीरपत्नी किरण अनिल वाघमारे यांना ४५ लाख आणि शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या वीरपत्नी मनीषा भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भाकरे व वीरपिता भगवंतराव भाकरे यांना ४० लाखांचा धनादेश देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com