agriculture news in Marathi 1127 ton pomegranate career to Bihar by Kisan railway Maharashtra | Agrowon

किसान रेल्वेद्वारे ११२७ टन डाळिंबाची बिहारला वाहतूक

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रातून एका महिन्यात ११२७ टना पेक्षा अधिक डाळिंबाची वाहतूक उत्तर भारतातील बिहार राज्यात करण्यात आली आहे. 

मुंबई : महाराष्ट्रातून एका महिन्यात ११२७ टना पेक्षा अधिक डाळिंबाची वाहतूक उत्तर भारतातील बिहार राज्यात करण्यात आली आहे. राज्यातून किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत असून, वाजवी दरात आणि वेगवान वाहतूक होत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

डाळिंब, सिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जिवंत  वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून केली जात आहे. किसान रेल्वेने आत्तापर्यंत वाहून नेलेल्या एकूण शेतमालांपैकी ११२७.६७ टन डाळिंबाची वाहतूक केली आहे.

एकूण शेतमालाच्या तुलनेत ती ६१ टक्के आहे. किसान रेल्वेस ७ ऑगस्टला देवळाली ते दानापूर (बिहार) पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर (बिहार)पर्यंत विस्तारित करण्यात आली. पुढे यास सांगोला-पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल्वे आठवड्यात तीनदा सुरू आहे. शेतक-यांचा या रेल्वे सेवेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ६२.९१ टक्के आहे. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ (पुणे) कडून किसान रेल्वेच्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

किसान रेल्वेची वैशिष्टे...

  • कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाकडून सेवा सुरू
  • शेतमालासह नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, ताजी डिलिव्हरी
  • शेतमाल वाहतुकीच्या संख्येवर बंधन नाही
  • रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत
  • वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत कमी वेळेत शेतमाल पुरवठा
  • ताजी वस्तू कमी वेळात बाजारात जात असल्याने नुकसान कमी
  • महाराष्ट्रातील फळे-भाजीपाल्यास रेल्वेद्वारे पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता
     

इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...