Agriculture news in marathi 113 Farmer's certification for loan waiver | Agrowon

जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव) व कराडी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे शेतकरी आधार प्रमाणीकरणाची चाचणी घेण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या ११३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले. आत्तापर्यंत कर्जमुक्ती योजनेत १ लाख ७३ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव) व कराडी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे शेतकरी आधार प्रमाणीकरणाची चाचणी घेण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या ११३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले. आत्तापर्यंत कर्जमुक्ती योजनेत १ लाख ७३ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

कर्जमुक्ती योजनेंतर्गत हिंगोणे (ता. यावल) येथे १३८ पात्र लाभार्थी असून, १२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे. यावलचे साहाय्यक निबंधक किशोर पाटील, जेडीसीसी बॅंकेचे विभागीय अधिकारी विनोद देशमुख, क्षेत्रीय अधिकारी पी. डी. पाटील, हिंगोणे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव विजयसिंग पाटील उपस्थित होते. वासुदेव सुधाकर वारके, लक्ष्मण हरी भोळे, सत्यभामा भालेराव यांना आधार प्रमाणीकरण प्रमाणपत्राचे वितरण झाले. 

कराडी (ता. पारोळा) येथे ८२ पात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. पैकी ७८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातील ३५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. चाचणीवेळी तहसीलदार अनिल गवांदे, साहाय्यक निबंधक गुलाब पाटील, जेडीसीसीचे विभागीय अधिकारी सुभाष पाटील, लेखापरीक्षक योगेश पाटील, विलास सोनवणे, सहकार अधिकारी सुनील पाटील, गटसचिव मधुकर संपत पाटील आदी उपस्थित होते. 

दोन दिवसांत काम पूर्ण करा 
कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरण चाचणीचा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी वेळोवेळी आढावा घेतला. या दोन गावांतील आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या योजनेंतर्गत जिल्हा बॅंकेच्या १ लाख ५१ हजार २०१ पात्र शेतकऱ्यांचे खाते आहेत. त्यांपैकी पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची संख्या १ लाख ४९ हजार ७०७ आहे. अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी यशस्वीरीत्या पोर्टलवर सबमीट झालेल्या कर्ज खात्यांची संख्या १ लाख ४९ हजार ७०७ असल्याची माहिती उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली. याशिवाय जिल्ह्यातील २ लाख १० हजार ६७७ शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न झाल्याची माहितीही त्यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...