...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होते

...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होते
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होते

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. दोन दिवसांपासून त्यांना 'व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात होते. फार पूर्वीच अटलजींना डिमेंशियासारख्या आजाराने ग्रासले होते. या व्यतिरिक्त ते किडनीच्या आजारानेही त्रस्त होते. डिमेंशिया म्हणजे काय? डिमेंशिया म्हणजे एक असा आजार ज्यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. डिमेंशिया झालेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा पाठीमागचे सगळे विसरून जातो. डिमेंशिया झालेल्या व्यक्तीमध्ये 60 ते 80 टक्के केसेस या अल्झायमरच्या असतात. अशा व्यक्ती सतत उदास आणि दुःखी राहतात. या व्यक्तींना आपलं नाव, ठिकाणं, एखाद्या व्यक्तीसोबत सुरू असलेलं बोलणं लक्षात ठेवताना अनेक अडचणी येतात. तसेच, सतत उदास राहणं, एखाद्याशी बोलताना त्रास होणं, वागण्यात बदल होणे, एखादी गोष्ट खाताना त्रास होणे, चालायला त्रास होणे. ही डिमेंशिया या रोगाची लक्षणे आहेत, यामुळे वाजपेयींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा होता.

याचबरोबर वाजपेयी किडनी संक्रमणामुळेही त्रस्त होते. त्यांची एकच किडनी काम करत होती. 11 जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं डायलिसिस करण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 2009 मध्ये त्यांना  ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता फार कमी झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com