खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट

अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. तर रब्बीसाठी ६० कोटींचे नियोजन आहे. काही बँकांकडून एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट 1140 crore peak loan target for kharif season
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट 1140 crore peak loan target for kharif season

अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. तर रब्बीसाठी ६० कोटींचे नियोजन आहे. काही बँकांकडून एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  खरीप हंगामाच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. प्रशासनाने खत, बियाण्याचे नियोजन पूर्ण केले असून, बँकांसाठी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. 

जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० खातेदारांना हे पीककर्ज वाटप केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा बँकेचा ५५१ कोटींचा तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा १२० कोटींचा वाटा नेमून देण्यात आला आहे. यानंतर उर्वरित पीककर्ज राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या माध्यमातून वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 

आगामी खरीप हंगामाला आता दीड महिना शिल्लक राहिलेला आहे. या काळात शेत मशागतीसह शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खतांची तजवीज करून ठेवत असतो. अशा कामांसाठी पैशांची गरज राहते. यासाठी पीककर्ज हे अत्यंत महत्त्वाची बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे. गेल्या वर्षात शासनाने पीककर्ज माफी केली होती. त्यामुळे पीककर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली होती. यंदा पीककर्ज घेतलेल्यांपैकी बहुतांश जणांनी जिल्हा बँकेचे कर्ज परतही केले. त्यामुळे पीककर्ज भरलेले शेतकरी यंदासाठी पात्र बनलेले आहेत. यंत्रणांनी यंदा नुकतीच पीकनिहाय पीककर्जाची रक्कमही वाढविली आहे.

रब्बी हंगामासाठी ६० कोटींची नियोजन आहे. खरीप व रब्बीमिळून जिल्ह्यात यंदा १२०० कोटी वाटप केले जाणार आहेत. जिल्हा बँकेने ३१ मार्चपर्यंत मागील कर्जवसुली करीत एक एप्रिलनंतर पुन्हा नव्या हंगामासाठी तयारी सुरू केली. काही ठिकाणी सेवा सहकारी सोसायट्यांच्या पुढाकाराने वाटपाचे काम सुरू केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून ३१ मेपर्यंत जुने कर्ज भरून घेतले जाते. 

यंदाही कोरोनाची अडचण  गेल्या वर्षात कोरोना संसर्गामुळे पीककर्ज वितरणात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. यंदाही याच काळात हा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोनामुळे यंदाच्या हंगामातही पीककर्ज वाटपाचे नियोजन करणे बँकांसाठी कसरतीचे काम झालेले आहे. बँकांमध्ये संसर्गाचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढल्याने कामांचा ताण आधीच निर्माण झालेला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com