Agriculture news in marathi 1140 crore peak loan target for kharif season | Page 3 ||| Agrowon

खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. तर रब्बीसाठी ६० कोटींचे नियोजन आहे. काही बँकांकडून एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. तर रब्बीसाठी ६० कोटींचे नियोजन आहे. काही बँकांकडून एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 
खरीप हंगामाच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. प्रशासनाने खत, बियाण्याचे नियोजन पूर्ण केले असून, बँकांसाठी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. 

जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० खातेदारांना हे पीककर्ज वाटप केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा बँकेचा ५५१ कोटींचा तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा १२० कोटींचा वाटा नेमून देण्यात आला आहे. यानंतर उर्वरित पीककर्ज राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या माध्यमातून वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 

आगामी खरीप हंगामाला आता दीड महिना शिल्लक राहिलेला आहे. या काळात शेत मशागतीसह शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खतांची तजवीज करून ठेवत असतो. अशा कामांसाठी पैशांची गरज राहते. यासाठी पीककर्ज हे अत्यंत महत्त्वाची बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे. गेल्या वर्षात शासनाने पीककर्ज माफी केली होती. त्यामुळे पीककर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली होती. यंदा पीककर्ज घेतलेल्यांपैकी बहुतांश जणांनी जिल्हा बँकेचे कर्ज परतही केले. त्यामुळे पीककर्ज भरलेले शेतकरी यंदासाठी पात्र बनलेले आहेत. यंत्रणांनी यंदा नुकतीच पीकनिहाय पीककर्जाची रक्कमही वाढविली आहे.

रब्बी हंगामासाठी ६० कोटींची नियोजन आहे. खरीप व रब्बीमिळून जिल्ह्यात यंदा १२०० कोटी वाटप केले जाणार आहेत. जिल्हा बँकेने ३१ मार्चपर्यंत मागील कर्जवसुली करीत एक एप्रिलनंतर पुन्हा नव्या हंगामासाठी तयारी सुरू केली. काही ठिकाणी सेवा सहकारी सोसायट्यांच्या पुढाकाराने वाटपाचे काम सुरू केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून ३१ मेपर्यंत जुने कर्ज भरून घेतले जाते. 

यंदाही कोरोनाची अडचण 
गेल्या वर्षात कोरोना संसर्गामुळे पीककर्ज वितरणात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. यंदाही याच काळात हा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोनामुळे यंदाच्या हंगामातही पीककर्ज वाटपाचे नियोजन करणे बँकांसाठी कसरतीचे काम झालेले आहे. बँकांमध्ये संसर्गाचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढल्याने कामांचा ताण आधीच निर्माण झालेला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...
पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणेसोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना...
केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात...परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील...
नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरूनाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस...
लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...
परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यतापरभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने...विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी...
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोषगोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व...
सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळवअकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन...
‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडलेसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून...
पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना...सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना...
कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात...
सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख...सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत...
‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः...मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून,...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘...पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५०...
डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान...औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा...
वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी...मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या...
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत...