agriculture news in Marathi 11500 crore rupees for flood affected people Maharashtra | Agrowon

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार कोटी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपये तरतुदीस मान्यता दिली आहे. 

मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपये तरतुदीस मान्यता दिली आहे. मंगळवारी (ता. ३) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता दिली.यातून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. आपद्‌ग्रस्त नागरिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 

या निधीपैकी मदतीसाठी १५०० कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी ३००० कोटी व बाधित क्षेत्रात सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७००० कोटी खर्चास देण्यास मान्यता देण्यात आली. 

सानुग्रह अनुदान ः कुटुंबांना कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तू यांचे नुकसानीकरिता ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडले असण्याची अट शिथिल करून ५ हजार रुपये प्रतिकुटुंब, कपड्यांचे नुकसानीकरिता आणि ५ हजार रुपये प्रतिकुटुंब, घरगुती भांडी, वस्तू यांच्या नुकसानीकरिता देण्यात येईल. 

पशुधन नुकसानीसाठी मदत 
दुधाळ जनावरांसाठी ४० हजार प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावरे ः ३० हजार प्रति जनावर, ओढकाम करणारी लहान जनावरे २० हजार प्रति जनावर, मेंढी/बकरी/डुक्कर ४ हजार रुपये (कमाल ३ दुधाळ जनावरे किंवा कमाल ३ ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल ६ लहान ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल ३० लहान दुधाळ जनावरे प्रति कुटुंब या मर्यादेत). कुक्कुटपालन पक्षी ५० रुपये प्रति पक्षी, अधिकतम ५००० रुपये प्रति कुटुंब. 

घरांच्या पडझडीसाठी मदत 
पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी १ लाख ५० हजार रुपये प्रति घर. अंशतः पडझड झालेल्या (किमान ५०%) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत ५० हजार. अंशत: पडझड झालेल्या (किमान २५%) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत २५ हजार. अंशत: पडझड झालेल्या (किमान १५%) कच्च्या/पक्क्या घरांसाठी १५ हजार रुपये. नष्ट झालेल्या झोपड्या १५ हजार रुपये. (शहरी भागात मात्र ही मदत घोषित केलेल्या झोपडपट्टी पट्ट्यातील पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांसाठी देय राहील. ग्रामीण भागात अतिक्रमित झोपडी जे नियमितीकरणास पात्र आहेत. पण अद्याप नियमितीकरण झालेली नाहीत ती पात्र राहतील.) 

मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी अर्थसाह्य 
अंशत: बोटीचे नुकसान १० हजार रुपये, बोटींचे पूर्णत: नुकसान २५ हजार रुपये, जाळ्यांचे अंशत: नुकसान ५ हजार, जाळ्यांचे पूर्णत: नुकसान ५ हजार रुपये. 

हस्तकला/कारागिरांना अर्थसाह्य 
जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. हस्तकला व हातमाग कारागीर यामध्ये बारा बलुतेदार, मूर्तिकार इत्यादी यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. 

दुकानदारांना अर्थसाह्य 
जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदार यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त .५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. 

टपरीधारकांना अर्थसाह्य
जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत, अशा टपरीधारकांपैकी अधिकृत टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली. 

कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ हजार रुपये इतकी मदत देण्यास मान्यता देण्यात आली. 

पुराच्या वारंवारितेचा अभ्यास करून अहवाल द्या ः मुख्यमंत्री 
पुराची वारंवारिता वाढत आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांची समिती स्थापन करून त्याचा अभ्यास करण्यात यावा. तसेच या अभ्यासामध्ये राष्ट्रीय जल विकास अभिकरण या संस्थेचा सहभाग घेण्यात यावा. या अभ्यासाचा अहवाल मंत्रिमंडळास सादर करण्यात यावा. महाड आणि चिपळूण या क्षेत्रातील गंधारी, सावित्री, वशिष्टी या नद्यांच्या खोलीकरणाचे व नदी पात्रात सुधारणा करण्याचे व पूर संरक्षक भिंती बांधण्याबाबत सखोल अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने पुढील तीन वर्षांत याबाबत कार्यक्रम राबविण्यात यावा. एककालिक आधारसामग्री अधिग्रहण प्रणाली पुढील तीन महिन्यांत उभी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...