मेगाभरतीत मराठा समाजासाठी साडे ११५०० नोकऱ्या राखीव

नोकरी
नोकरी

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी सुधारित बिंदूनामावली विहित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आगामी ७२ हजार सरकारी पदांच्या मेगा भरतीत मराठा तरुण, तरुणींसाठी ११,५२० नोकऱ्या राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता. ५) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.  सामाजिक आणि शैक्षणिक मागास असा विशेष प्रवर्ग तयार करून त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्यावतीने विविध आस्थापनांधील शासकीय, निमशासकीय, सेवेत सरळसेवा भरतीच्या विविध पदांसाठी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी जारी केलेल्या निर्णयानुसार मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण निश्चित केले आहे. या निर्णयानुसार यापुढील सर्व भरतींमध्ये रिक्त असणारी पदे ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी म्हणजेच  मराठा समाजासाठी आरक्षित असणार आहेत. हा निर्णय राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, शासकीय महामंडळे, विद्यापीठ, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम इत्यादींना लागू असणार आहे. हा आदेश ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू करण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आला असल्याने यापुढील सर्व भरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी सुरू झालेल्या भरतीप्रक्रियेला लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सरळसेवा भरतीत आरक्षणाच्या तरतुदीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला समाविष्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सुधारित बिंदूनामावली निश्चित केली आहे. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित ४८ टक्के खुल्या प्रवर्गातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले असून यासंदर्भात सुधारित बिंदूनामावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण ७२ हजार पदे भरली जाणार असून, पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ३६ हजार पदे भरली जातील. सध्या राज्यात १ लाख ८० हजार पदे रिक्त आहेत. ७२ हजारांपैकी ५ हजार पदे वर्ग १ आणि वर्ग २ संवर्गातील आहेत. ६७ हजार पदे वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गात भरली जातील. पुढील आठवड्यात जाहिरात राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली असून ७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होऊन, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी रिक्त असलेली पदे आणि त्यानंतर सरळसेवा कोट्यातील रिक्त होणारी संभाव्य पदे भरताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात यापुढील भरती प्रक्रियेत मराठा समाजाला गणले जाणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com