देशात कोरोनाचे ११५२ बळी; रुग्ण संख्या ३५ हजारांवर

देशभरातील कोरोनाच्या बळींचा आकडा आता १ हजार १५२ वर गेला आहे. देशात गुरूवारी (३० एप्रिल) सायंकाळपासून ७७ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ हजार ७५५ ने वाढून ३५ हजार ३६५ वर गेली आहे.
देशात कोरोनाचे ११५२ बळी; रुग्ण संख्या ३५ हजारांवर
देशात कोरोनाचे ११५२ बळी; रुग्ण संख्या ३५ हजारांवर

नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाच्या बळींचा आकडा आता १ हजार १५२ वर गेला आहे. देशात गुरूवारी (३० एप्रिल) सायंकाळपासून ७७ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ हजार ७५५ ने वाढून ३५ हजार ३६५ वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या २५ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, ९ हजार ६४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर २५.६३ टक्के आहे. एकूण रुग्णांमध्ये १११ विदेशी व्यक्तींचा समावेश आहे. 

देशात गुरुवारी सायंकाळपासून एकूण ७७ जणांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील २७, गुजरात १७, पश्‍चिम बंगाल ११, मध्य प्रदेश व राजस्थानात प्रत्येकी ७, दिल्ली ३, आंध्र प्रदेश २ आणि कर्नाटकातील एका बळीचा समावेश आहे. देशभरात कोरोनाचे आतापर्यंत १ हजार १५२ बळी गेले आहेत. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ४५९ जणांचा समावेश आहे. त्या खालोखाल गुजरात २१४, मध्य प्रदेश १३७, दिल्ली ५९, राजस्थान ५८, उत्तर प्रदेश ४१, पश्‍चिम बंगाल व आंध्र प्रदेश प्रत्येकी ३३ यांचा समावेश आहे.तमिळनाडू २७, तेलंगण २६ आणि कर्नाटकमध्ये २२ मृत्युंची नोंद झाली आहे.

भारतात कोरोनाचे आतापर्यंत ३५ हजारहून अधिक रुग्ण आढळले असून, १ हजार १५२ जणांचा बळी गेला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक १० हजार ४९८ रुग्ण सापडले आहेत.

देशातील कोरोना रुग्ण

  • महाराष्ट्र - १०,४९८
  • गुजरात - ४,३९५
  • दिल्ली - ३,५१५
  • मध्य प्रदेश - २,७१९
  • राजस्थान - २,५८४
  • उत्तर प्रदेश - २,२८१
  • आंध्र प्रदेश - १,४६३
  • तेलंगण - १,०३९
  • पश्‍चिम बंगाल - ७९५
  • जम्मू काश्‍मीर - ६१४
  • कर्नाटक - ५७६
  • केरळ - ४९७
  • बिहार - ४२६
  • पंजाब - ३५७
  • हरियाना - ३१३
  • ओडिशा - १४३
  • झारखंड - १११
  • उत्तराखंड - ५७
  • ------------------ कमी रुग्ण असलेली राज्ये

  • मणिपूर - २
  • त्रिपुरा - २
  • ----------------- रुग्ण नसलेली राज्ये

  • मिझोराम
  • अरुणाचल प्रदेश 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com