Agriculture news in Marathi 1180 per banana in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात केळीला ११८० रुपये दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत. मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात सोमवारी (ता. १८) केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

जळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत. मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात सोमवारी (ता. १८) केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जळगाव, धुळ्यातही दर्जेदार केळीच्या दरात क्विंटलमागे १० ते २० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर ११८० रुपये प्रतिक्विंटल एवढा झाला आहे. 

किमान दर ६०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. सणासुदीसह कमी आवकेमुळे केळीला यंदा चांगले दर मिळाले. उत्तरेकडील म्हणजेच पंजाब, काश्मीर, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये केळीला मोठा उठाव आहे. राज्यातही सणासुदीसह इतर फळांची आवक बाजारात कमी असल्याने केळीला उठाव आहे. पण केळीची आवक गेल्या १० दिवसांत वाढली आहे.  

रावेर, मुक्ताईनगर भागातही आगाप लागवडीच्या नवती बागांमध्ये काढणी सुरू झाली आहे. कमी दर्जाच्या केळीला खानदेशात मध्यंतरी ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. पण सध्या ६०० ते ६५० रुपये दर आहे. मध्य प्रदेशात कमी दर्जाच्या केळीला किमान ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. जळगाव, धुळ्यातून उत्तरेकडे बॉक्समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक सुरू आहे. उत्तरेकडील मॉल, आठवडी बाजार सुरू आहेत. 

शिवाय दिल्ली येथील आझादपूर बाजारातही केळीला मागणी आहे. या भागातील मोठे खरेदीदार यावलमधील फैजपूर, रावेरातील सावदा, चोपडा आदी भागातील एजंटच्या मदतीने केळीची खरेदी करून घेत आहेत. केळीची आवक जळगाव, धुळ्यात गेल्या १० ते १५ दिवसांत २५ ट्रकने (एक ट्रक १५ टन क्षमता) वाढली असून, एकूण २२० ट्रकपेक्षा अधिक आवक जळगाव, धुळ्यात मिळून होत आहे. राज्यातून मागणी काहीशी कमी झाली आहे.


इतर अॅग्रो विशेष
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...