नाशिक परिमंडळात कृषिपंपाच्या थकबाकीपोटी ११९ कोटी रुपये भरले

नाशिक : ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी नाशिक परिमंडळात गतीने सुरु आहे. एकूण २ हजार ८७३ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.
119 crore was paid for arrears of agricultural pumps in Nashik circle
119 crore was paid for arrears of agricultural pumps in Nashik circle

नाशिक : ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी नाशिक परिमंडळात गतीने सुरु आहे. एकूण २ हजार ८७३ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या २ हजार ५३४ जोडण्यांचा समावेश आहे. परिमंडळात १ लाख ५३ हजार ६२० शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या थकबाकीपोटी ११९ कोटी रुपयांचा भरणा केला. 

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या सोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु आहे. त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही, त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येईल. 

लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या नाशिक मंडळामध्ये ५०५, मालेगाव मंडळामध्ये २५५ आणि नगर मंडळामध्ये १७७४ वीज जोडण्या अशा एकूण नाशिक परिमंडळात २५३४ जोडण्या  देण्यात आल्या आहेत. एकूण नाशिक परिमंडळात १ लाख ५३ हजार २६८ शेतकऱ्यांनी ११९ कोटी रुपये भरले.  

‘दोन कृषिपंपांना वीजजोडणी’ 

‘‘लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी, उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे एका रोहित्राद्वारे अधिकाधिक दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी मिळेल. योजनेचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com