कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्
अॅग्रो विशेष
रत्नागिरी जिल्ह्यात बारा कोटींचे नुकसान
रत्नागिरी ः यंदा ११३ टक्के पावसाची नोंद झाली असून, ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. वादळी परिस्थितीमुळे घरांचे, गोठ्यांचे सुमारे बारा कोटी रुपयांचे नुकसान झाले. पुरामुळे १७३ कुटुंबे स्थलांतरित करावी लागली. जिल्ह्यात सुमारे १२ कोटी रुपयांचे नुकसान नोंदविले गेले आहे.

जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी ३४०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर तालुक्यांतील नद्याला आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले आहे. घरेच्या घरे पाण्याखाली गेली होते. शेकडो एकर भातशेतीचे नुकसान झाले असून जमीन नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५९ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून ७६३ घरांना फटका बसला आहे. त्याचे सुमारे १२ कोटी रुपयांचे नुकसान नोंदविले गेले आहे. पूर परिस्थितीमुळे १३ गावांमधील १७३ कुटुंबातील ६१७ जणांना स्थलांतरित करण्यात आले. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने चिपळूणात १० वेळा तर जगबुडी पूल १३ वेळा बंद ठेवल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
अर्जुना नदीच्या पुराची पातळी वाढल्याने कोदवली पुलावरील वाहतूक ११ वेळा बंद ठेवली. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण केंद्र अहोरात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडण्याचा घटना या काळात मोठ्या प्रमाणात घडल्या. गुहागर आणि दापोली तालुके वगळता इतर तालुक्यांत २६ ठिकाणी जमिनीला भेगा गेल्याची नोंद झाली.
- 1 of 431
- ››