agriculture news in Marathi 12 crore farmers will get benefit under PM-Kisan Maharashtra | Agrowon

‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पीएम-किसान’ योजनेत अधिक शेतकऱ्यांचा समावेश करणार आहे. सध्या योजनेचा ९ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १२ कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

 ‘‘सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत ९ कोटी शेतकऱ्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना या योनजेचा लाभ देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पीएम-किसान’ योजनेत अधिक शेतकऱ्यांचा समावेश करणार आहे. सध्या योजनेचा ९ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १२ कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

 ‘‘सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत ९ कोटी शेतकऱ्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना या योनजेचा लाभ देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी ‘पीएम-किसान’ योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ८ कोटी ४६ लाख शेतकऱ्यांना ५० हजार ८५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांना ५६ हजार कोटी रुपये वितरित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे,’’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी केंद्र सरकारने ‘पीएम-किसान’ योजनेसाठी ७५ हजार कोटींची तरतूद केली असून, १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाने कृषी मंत्रालयाला पत्र लिहून देशातील दोन कोटी मच्छीमारांचा या योजनेत समावेश करण्यास सुचविले आहे. मच्छीमारांचा योजनेत समावेश केल्यानंतर पुढील वर्षी लाभार्थ्यांची सख्या वाढणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

किसान क्रेडिट कार्ड देणार
कृषी मंत्रालयाने जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांचे आधार संलग्न करण्याचे कामही हाती घेतले आहे. यातून शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विम्यासारख्या योजनांचा लाभ देण्यासाठी फायदा होईल. ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना व्याज अनुदानावर कर्ज उपलब्ध होईल.

मच्छीमारांचाही समावेश करा ः पशुसंवर्धन मंत्रालय
पशुसंवर्धन मंत्रालयाने कृषी मंत्रालयाला पत्र लिहून देशातील दोन कोटी मच्छीमारांचा या योजनेत समावेश करण्यास सुचविले आहे. कृषी मंत्रालयाकडून या प्रस्तावावर विचार सुरू आहे. परंतु, मच्छीमारांचा समावेश करणे कठीण आहे. कारण, सरकारने भूमिहीन शेतकऱ्यांचाही समावेश या योजनेत केलेला नाही. मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते, तर ‘पीएम-किसान’ योजनेतही त्यांचा समावेश होऊ शकतो, असे पशुसंवर्धन मंत्रालयाचे म्हणणे आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...