औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीची १२ लाख पाकिटे उपलब्ध

औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीची १२ लाख पाकिटे उपलब्ध
औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीची १२ लाख पाकिटे उपलब्ध

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशी, सोयाबीन, मक्यासारख्या नगदी पिकांकडेच ओढा आहे. या वर्षी कपाशीच्या २३ लाख बियाणे पाकिटांचे नियोजन करण्यात आले. २० लाख पाकिटांची गरज आहे. आतापर्यंत साडेबारा लाख पाकिटे कंपन्यांकडून उपलब्ध होऊन शुक्रवारपासून (ता. ७) विक्रीला सुरवात झाली. 

सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. कृषी विभागाने जिल्ह्यामध्ये या वर्षी कपाशीचे ४ लाख हेक्‍टर क्षेत्र नियोजित केले. सध्या पुरेशी पाकिटे उपलब्ध आहेत; मात्र शेतकऱ्यांनी अजून खरेदी सुरू केली नाही. सोयाबीनची तीन हजार ४११ क्विंटल बियाणे बाजारात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात साधारणत: शनिवारनंतर (ता. १५) मॉन्सूनची येण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर बियाण्यांच्या खरेदीला सुरवात होईल. त्याचबरोबर कंपन्यांकडून मागणीप्रमाणे बियाण्यांचा पुरवठा केला जाईल, असे कृषी विभागातर्फे सागंण्यात आले. 

२२३८१ मेट्रिक टन खतसाठा औरंगाबाद जिल्ह्यात खरिपासाठी २ लाख २७ हजार २२० मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज असते. गेल्या रब्बी हंगामात वापरात न आलेला ६६८४.८८ मेट्रिक टन खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध होता. तसेच ८५ हजार ८११ मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर होते. त्यापैकी आणि झालेल्या पुरवठ्याअंती जिल्ह्यात ९३ हजार ७१३ मेट्रिक टन खते उपलब्ध झाले. त्यापैकी ७१ हजार ३३२ मेट्रिक टन खताची विक्री झाली. 

जिल्ह्यात २२३८१ मेट्रिक टन रासायनिक खते आहेत. त्यामध्ये डीएपी १२५७ मेट्रिक टन, एमओपी २३ मेट्रिक टन, एनपीके १६७२९ मेट्रिक टन, एसएसपी ४९० मेट्रिक टन, तर युरिया ३८८२ मेट्रिक टन शिल्लक असल्याची माहिती मिळाली. 

पीक  सध्याची बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये
मका १४३५
बाजरी ३८२.६
तूर २३० 
मूग   २४७
उडीद १४१
ज्वारी ०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com