Agriculture news in marathi 12 more people get corona infection in Islampur | Agrowon

इस्लामपूर येथे आणखी १२ जणांना ‘कोरोना’ची लागण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

सांगली ः इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्त कुटुंबातील आणखी १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारी (ता. २७) स्पष्ट झाले. त्यांचे अहवाल दुपारी हाती आले. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण २३ झाली आहे. त्यात संबंधित कुटुंबात काम करणाऱ्या दोघा मोलकरणींचा समावेश आहे. त्यांच्यावर मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, यासोबत पाठवलेले १३ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. 

सांगली ः इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्त कुटुंबातील आणखी १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारी (ता. २७) स्पष्ट झाले. त्यांचे अहवाल दुपारी हाती आले. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण २३ झाली आहे. त्यात संबंधित कुटुंबात काम करणाऱ्या दोघा मोलकरणींचा समावेश आहे. त्यांच्यावर मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, यासोबत पाठवलेले १३ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी चार रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. इस्लामपूर येथून सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जावून आलेल्यांना ही लागण झाली. त्यामुळे या चार जणांशी संबंधित लोकांना तातडीने अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांतील कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात त्याच कुटुंबाशी निगडीत ५ जणांना लागण झाल्याचा अहवाल आला आणि काल त्यात आणखी दोन जणांची भर पडली होती. आज त्यात आणखी १२ जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले असून आता जिल्ह्यातील एकूण संख्या २३ झाली आहे. 

सांगली जिल्ह्यासाठी धक्कादायक अशी माहिती आता हाती आल्याने पुन्हा एकदा सारे हादरून गेले आहेत. इस्लामपूर हाय अलर्ट करण्यात आले आहे. या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या एकूण ३९ जणांना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे अहवालही अद्याप यायचे आहेत. त्यातील कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्यांचे नमुने पाठवून तपासणी केली जात आहे. एकूणच इस्लामपुरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. 

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. आधीपासूनचे सर्वच रुग्ण येथे ठेवण्यात आले आहेत. आता अलगीकरण कक्षातून हे नवे बारा रुग्णही मिरजेत दाखल केले जाणार आहेत. या रुग्णांसोबत आणखी १३ जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. ते निगेटीव्ह आल्याने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी निश्‍वास टाकला आहे. या लोकांना काही काळासाठी अलगीकरण कक्षात ठेऊन घरी सोडले जाणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...