agriculture news in Marathi, 12 percent extra fertilizer center will give, Maharashtra | Agrowon

केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक खते
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा खताची उपलब्धता १२ टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. “अर्थात, कंपन्यांकडे गेल्या वर्षीचाच स्टॉक पडून आहे. त्यामुळे चालू खरिपात कोणत्याही ग्रेडची टंचाई भासणार नाही,” असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा खताची उपलब्धता १२ टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. “अर्थात, कंपन्यांकडे गेल्या वर्षीचाच स्टॉक पडून आहे. त्यामुळे चालू खरिपात कोणत्याही ग्रेडची टंचाई भासणार नाही,” असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

खताच्या बाजारपेठांमध्ये मेच्या पंधरवड्यापासून ‘लिफ्टिंग’ सुरू होणे अपेक्षित आहे. मॉन्सूनचे आगमन वेळेत झाल्यास शेतकरी वर्ग जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून संयुक्त खत खरेदीला सुरवात करू शकतो. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत युरियाची विक्री शिगेला पोचू शकते, असा सध्याचा अंदाज आहे. राज्यात गेल्या खरिपाच्या तुलनेत यंदा युरियाचा वापर वाढेल, अशी शक्यता गृहित धरण्यात आलेली नाही. त्यामुळेच गेल्या खरिपाइतकाच म्हणजे एकूण १५ लाख टन युरिया उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले आहे.

केंद्राने गेल्या हंगामात १५ लाख टनांच्या आसपास युरिया राज्यासाठी मंजूर केला. मात्र, कंपन्यांनी फक्त १३.६२ लाख टन मालाचा पुरवठा केला. अर्थात, पुरवठा कमी असूनदेखील शेतकऱ्यांनी वापर मात्र १३ लाख टनांचाच केला होता. याचाच अर्थ युरियाचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल आहे किंवा राज्याच्या काही भागांत पुरेशा पावसाचादेखील परिणाम असावा, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

चालू खरिपात गेल्या वर्षीप्रमाणेच अनुदानित खताच्या कोणत्याही ग्रेडची विक्री पॉस यंत्र करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. चोरट्या बाजारात खतविक्री, कृत्रिम टंचाई याला पॉस तंत्रामुळे आळा बसतो, असा दावा कृषी अधिकाऱ्यांचा आहे. 

“गेल्या हंगामात राज्याच्या काही भागात पॉस (पॉइंट ऑफ सेल) यंत्रे चालत नसल्याचे सांगून खते विकली गेली होती. मात्र, आता २५ हजार यंत्रे वाटप करण्यात आली आहेत. यंत्र न वापरल्यास कंपन्यांना अनुदान मिळणार नसल्याने यंदा पॉसविना खत विक्री होणार नाही,” असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

मागणी ३६ लाख टनांपर्यंत
‘‘राज्यात यंदा रासायनिक खताची एकूण मागणी ३५ ते ३६ लाख टनांच्या आसपास राहील, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या हंगामात आम्ही खताची एकूण उपलब्धता ३९.५० लाख टन ठेवण्यासाठी नियोजन केले होते. प्रत्यक्षात विक्री ३६.४३ लाख टनांच्या आसपास झाली होती. यंदा टंचाई अजिबात होऊ नये यासाठी वाढीव मागणी केंद्र शासनाला केली गेली. त्यामुळे राज्यासाठी खताची एकूण उपलब्धता १२ टक्क्यांनी जादा ठेवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, एकूण ४० लाख ५० हजार टन रासायनिक खते यंदा उपलब्ध असतील,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...