agriculture news in Marathi, 12 ton grapes export from sangali, Maharashtra | Agrowon

सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

सुरवातीपासून पाण्याची टंचाई असल्याने टॅंकरने पाणी देऊन बागा जगविल्या. निर्यातक्षम द्राक्षाला चांगले  दर मिळतील अशी आशा होती. परंतु अपेक्षित दर मिळाले नसल्याने निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम समाधानकारक नाही.
- काका पाटील, द्राक्ष उत्पादक, पळशी, ता. खानापूर

सांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी आखाती आणि युरोपमध्ये आतापर्यंत सुमारे १२ हजार ०४७ टन द्राक्षे निर्यात केली आहेत. मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलोस १० ते २० रुपयांनी कमी दर मिळाला. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. 

सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्रात वाढ होत आहे. अनेक शेतकरी पाणीटंचाईवर मात करत दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी युरोप आणि आखाती देशात प्रामुख्याने द्राक्ष पाठवितात. यंदा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ६० ते ९० रुपये असा दर मिळाला होता. द्राक्षाला मागणी देखील होती. यंदा मात्र प्रारंभी द्राक्ष निर्यातीस अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे द्राक्षाला अपेक्षित दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्षाचा दर सुरवातीपासून ५० ते ७० रुपये असा राहिला. त्यामध्ये वाढ झाली नाही. परिमाणी, गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षात निर्यातक्षम द्राक्षाला १० ते २० रुपये कमी दर मिळाला.

जिल्‍ह्यातून यंदा युरोपमध्ये ५७२ कंटेनर म्हणजे ६,८६४ टन, तर आखाती देशात ३९२ कंनेटर म्हणजे ५,१८२.९८६ टन एकूण १२,०४७. ९६८ जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. प्रामुख्याने तासगाव, खानापूर आणि मिरज तालुक्‍याचा पूर्व भागातील शेतकरी द्राक्ष निर्यात करताहेत. यंदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असलेल्या क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र शेतकऱ्यांनी अडचणींवर मात करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...