‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२० कोटींचा वित्तपुरवठा

‘एफएमओ’ने भारतातील शेतकरी उत्पादक कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे, ही घटना केवळ सह्याद्री फार्म्स नव्हे तर देशातील एकूण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी आश्‍वासक व अभिमानास्पद मानली पाहिजे. भारतीय शेतीचे अनोखे मॉडेल जगाला दाखविण्याची ताकद शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये आहे. शेतकरी कंपन्यांनी ‘सीड टू प्लेट’ या पद्धतीने काम केले तर भारतीय शेतीला उज्ज्वल भवितव्य आहे. - विलास शिंदे, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स कं.
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२० कोटींचा वित्तपुरवठा
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२० कोटींचा वित्तपुरवठा

नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास योग्य मार्गाने केला तर काय घडू शकते याची प्रचिती देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला आली आहे. नेदरलँड येथील ‘एफएमओ बँक (नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स कं.) सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला सुमारे १२० कोटींचा (१५ दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात वित्त पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.  ‘एफएमओ’ ही नेदरलँड्स (हॉलंड) सरकारच्या मालकीचा उपक्रम असून ‘डच उद्योजकता विकास बँक’ अशीही या बँकेची ओळख आहे. ‘एफएमओ’ने सह्याद्रीला केलेला हा आर्थिक पुरवठा सह्याद्री कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.  सह्याद्रीला देऊ केलेल्या प्रस्तावित कर्ज स्वरूपातील वित्तपुरवठ्याचा निर्णय जाहीर करताना ‘एफएमओ’ने म्हटले आहे की, या गुंतवणुकीमुळे कृषी आणि कृषिप्रक्रिया कार्याला चालना मिळून शेतमालाची नासाडी थांबू शकेल. सह्याद्री कंपनीने कृषी इनपूट आणि आणि उत्पादित कृषिमालाच्या मार्केटिंगसाठी प्रभावी व्यासपीठ तयार केले आहे. ज्यामुळे शेतकरी कंपन्या कृषी उत्पादनात आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतील. भारतातील छोट्या व सीमान्त शेतकऱ्यांना शेतकरी कंपनीच्या माध्यमातून शेतमालास अधिक चांगले मूल्य मिळेल. ज्यायोगे त्यांचे उत्पन्न वाढून दारिद्रय दूर होण्यास हातभार लागू शकेल असे सांगितले आहे. शेतमाल संकलन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी गोदामांचे बांधकाम, कोल्ड स्टोअरेजसह वितरण केंद्रे आणि लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्थेसाठी रेफ्रिजरेटेड वाहने, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये शेतमालाचे रिटेल स्टोअर्स उभारणी आणि कंपनीच्या विद्यमान उत्पादन केंद्राचा विस्तार या कारणांसाठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे ‘एफएमओ’ने स्पष्ट आहे. हा प्रस्ताव अमलात आणण्यासाठी दिल्लीतील अल्पेन कॅपिटल या सल्लागार कंपनीने सह्याद्रीला साह्य केले.  विलास शिंदे अभिनंदनास पात्र  शेतकरी एकत्र येऊन काय साध्य करू शकतात, याचे सह्याद्री फार्मर्स कंपनी हे ज्वलंत उदाहरण आहे. ‘एफएमओ’ने सह्याद्रीला वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी श्री. विलास शिंदे कौतुकास पात्र आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. असे ट्विट राष्ट्रीय अवर्षण-प्रवणक्षेत्र प्राधिकरण, नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com