agriculture news in Marathi, 120 crore loan for Sahyadri farms from FMO , Maharashtra | Agrowon

‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२० कोटींचा वित्तपुरवठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

‘एफएमओ’ने भारतातील शेतकरी उत्पादक कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे, ही घटना केवळ सह्याद्री फार्म्स नव्हे तर देशातील एकूण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी आश्‍वासक व अभिमानास्पद मानली पाहिजे. भारतीय शेतीचे अनोखे मॉडेल जगाला दाखविण्याची ताकद शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये आहे. शेतकरी कंपन्यांनी ‘सीड टू प्लेट’ या पद्धतीने काम केले तर भारतीय शेतीला उज्ज्वल भवितव्य आहे. 
- विलास शिंदे, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स कं.

नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास योग्य मार्गाने केला तर काय घडू शकते याची प्रचिती देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला आली आहे. नेदरलँड येथील ‘एफएमओ बँक (नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स कं.) सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला सुमारे १२० कोटींचा (१५ दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात वित्त पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. 

‘एफएमओ’ ही नेदरलँड्स (हॉलंड) सरकारच्या मालकीचा उपक्रम असून ‘डच उद्योजकता विकास बँक’ अशीही या बँकेची ओळख आहे. ‘एफएमओ’ने सह्याद्रीला केलेला हा आर्थिक पुरवठा सह्याद्री कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. 

सह्याद्रीला देऊ केलेल्या प्रस्तावित कर्ज स्वरूपातील वित्तपुरवठ्याचा निर्णय जाहीर करताना ‘एफएमओ’ने म्हटले आहे की, या गुंतवणुकीमुळे कृषी आणि कृषिप्रक्रिया कार्याला चालना मिळून शेतमालाची नासाडी थांबू शकेल.

सह्याद्री कंपनीने कृषी इनपूट आणि आणि उत्पादित कृषिमालाच्या मार्केटिंगसाठी प्रभावी व्यासपीठ तयार केले आहे. ज्यामुळे शेतकरी कंपन्या कृषी उत्पादनात आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतील. भारतातील छोट्या व सीमान्त शेतकऱ्यांना शेतकरी कंपनीच्या माध्यमातून शेतमालास अधिक चांगले मूल्य मिळेल. ज्यायोगे त्यांचे उत्पन्न वाढून दारिद्रय दूर होण्यास हातभार लागू शकेल असे सांगितले आहे.

शेतमाल संकलन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी गोदामांचे बांधकाम, कोल्ड स्टोअरेजसह वितरण केंद्रे आणि लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्थेसाठी रेफ्रिजरेटेड वाहने, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये शेतमालाचे रिटेल स्टोअर्स उभारणी आणि कंपनीच्या विद्यमान उत्पादन केंद्राचा विस्तार या कारणांसाठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे ‘एफएमओ’ने स्पष्ट आहे. हा प्रस्ताव अमलात आणण्यासाठी दिल्लीतील अल्पेन कॅपिटल या सल्लागार कंपनीने सह्याद्रीला साह्य केले. 

विलास शिंदे अभिनंदनास पात्र 
शेतकरी एकत्र येऊन काय साध्य करू शकतात, याचे सह्याद्री फार्मर्स कंपनी हे ज्वलंत उदाहरण आहे. ‘एफएमओ’ने सह्याद्रीला वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी श्री. विलास शिंदे कौतुकास पात्र आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. असे ट्विट राष्ट्रीय अवर्षण-प्रवणक्षेत्र प्राधिकरण, नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले आहे.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...