हवामानाच्या १२० वर्षांतील नोंदी आता संकेतस्थळावर 

बदलत्या हवामानाच्या काळात भारतीय हवामान विभागाचे महत्त्व वाढले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या १२० वर्षांतील महत्त्वाच्या नोंदी हवामान विभागाकडे आहे. या सर्व नोंदी स्वतंत्र http://cdsp.imdpune.gov.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत.
120 years of weather records now on the website
120 years of weather records now on the website

पुणे : बदलत्या हवामानाच्या काळात भारतीय हवामान विभागाचे महत्त्व वाढले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या १२० वर्षांतील महत्त्वाच्या नोंदी हवामान विभागाकडे आहे. या सर्व नोंदी स्वतंत्र http://cdsp.imdpune.gov.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. हवामान अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनाही या नोंदी पाहता, डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हवामानावर अधिक अभ्यास होऊन त्याविषयी जनजागृती होणार आहे. 

पुणे हे देशातील, नव्हे तर जगातील अत्यंत महत्त्वाचे असे भारतीय हवामान विभाग म्हणून ओळखले जाते. या विभागाकडे सन १९०० पासूनच्या संग्रहित नोंदी आहेत. या सर्व गेल्या १२० वर्षांत सातत्याने घेतलेल्या नोंदीचे डिजिटायझेशनही करण्यात आले आहे. राष्ट्रीय विदा केंद्र (एनडीसी) आणि हवामान विभागाच्या 

पुणे कार्यालयातील क्लायमेट रिसर्च ॲण्ड सर्व्हिस (सीआरएस) यांनी या नोंदींचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करून या नोंदी खुल्या केल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या देशभरात जवळपास दोनशे वेधशाळा आणि तीनशेहून अधिक उपवेधशाळा आहेत. तसेच स्वयंचलित हवामान केंद्राच्या (एडब्ल्यूएस) अंतर्गत हवामान केंद्र आणि प्रादेशिक हवामान केंद्र (आरएमसी) आहेत. हवामानाच्या अंदाजांची प्रारूपे ठरवण्यासाठी अचूक नोंदी आवश्यक असतात. 

स्थानिक नोंदी आणि उपग्रहाकडून आलेल्या नोंदी राष्ट्रीय विदा केंद्रात साठवल्या जातात. हवामानाच्या नोंदींमध्ये तापमान, उष्मा, पाऊस, हवेचा दाब आदी घटक दिवसभरातून आठवेळा नोंदवले जातात. या सर्व नोंदी विदा संकेतस्थळावर पाहण्यासाठी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. देशातील व जगातील आवड असलेल्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येऊ शकतो. शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी आता उपलब्ध झाल्याने तापमान, पाऊस, चक्रीवादळे अशा विविध घटकांशी संबंधित झालेली वाढ किंवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास, त्यातून झालेले बदल यांबाबतचे संशोधन या विदाच्या आधारे करणे शक्य आहे. त्यामुळे देशातील हवामानाशी संबंधित संशोधनाला या संकेतस्थळाद्वारे चालना मिळू शकते. 

ग्रंथालयाची मोलाची भूमिका  हवामानातील बदल, अचूक अंदाज, हवामानाची पार्श्वभूमी तपासण्यासाठी या ग्रंथालयाची मोलाची भूमिका राहिली आहे. ग्रंथालयाची स्थापना १९२२ मध्ये झाली आहे. ग्रंथालयामध्ये तब्बल १३ हजार ३५० पुस्तके आहेत. यामध्ये हवामान शास्त्र, वातावरणातील बदल, कॉम्युटर सायन्स, हवामान विषयातील सांख्यिकी विषयक पुस्तकांचा समावेश आहे. आजही या पुस्तकांचा, अहवालाचा वापर हवामान विभागातील शास्त्रज्ञ अभ्यासासाठी करत आहेत. या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयामार्फत या पुस्तकांचे जतन देखील केलेले आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हवी ती पुस्तके इंटरनेच्या माध्यमातून घरबसल्या शोधता येऊ शकते. ही सर्व पुस्तके पुणे हवामान विभागाच्या www.imdpune.gov.in या संकेतस्थळावर १९ नोव्हेबर २००८ पासून ग्रंथालयाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

हवामान विभागाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी संग्रहित आहेत. गेल्या काही वर्षांत डिजिटल पद्धतीने नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे पूर्वीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करण्यात आले. नव्या संकेतस्थळाद्वारे त्या-त्या वेळची निरीक्षणे, वातावरणातील बदल, पाऊस, चक्रीवादळे आदींच्या नोंदी पाहता येतील. डाउनलोडही करता येईल. आतापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे काही महिने जात होते. मात्र आता या संकेतस्थळावरून कधीही हवा तेव्हा उपलब्ध होऊ शकेल.  - डॉ. डी. शिवानंद पै, प्रमुख, क्लायमेट रिसर्च ॲण्ड सर्व्हिस, भारतीय हवामान विभाग पुणे   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com