राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार आधुनिक 

शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात असताना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यातील १२१ आश्रमशाळा आदर्श आणि अत्याधुनिक केल्या जाणार आहेत.
121 tribals in the state Ashram school will be modern
121 tribals in the state Ashram school will be modern

पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात असताना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यातील १२१ आश्रमशाळा आदर्श आणि अत्याधुनिक केल्या जाणार आहेत. डिजीटल शिक्षणाबरोबरच विविध प्रयोगशाळा सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.  राज्यात आदिवासी विभागाच्या ४९७ आश्रमशाळा आहेत. त्यापैकी विविध जिल्ह्यांतील १२१ शाळा आदर्श आणि आधुनिक करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. शाळा आदर्श करत असताना, दर्जेदार पायाभूत सुविधांबरोबरच आधुनिक शिक्षण सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये सुसज्ज इमारती, डिजिटल प्रयोगशाळा, सौरऊर्जेवरील यंत्रणा आदींचा समावेश आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये कौशल्य विकास, नवनिर्मितीसाठी विचार व्यवस्था, वैज्ञानिक प्रवृत्ती, कृतीयुक्त शिक्षण आदी शिक्षणाबरोबरच पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन, कला, क्रीडा आणि संगीत शिक्षणाचे देखील धडे दिले जाणार आहेत. 

पुण्यातील दहा आश्रमशाळांचा समावेश  पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील प्रत्येकी ५ अशा एकूण १० आश्रमशाळांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, आहुपे, गोहे, तेरंगूण, राजपूर या पाच तर जुन्नर तालुक्यातील खिरेश्‍वर, अंजनावळे, सोनावळे, खटकाळे, सोमतवाडी या शाळांचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com