Agriculture News in Marathi 121 tribals in the state Ashram school will be modern | Agrowon

राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार आधुनिक 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात असताना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यातील १२१ आश्रमशाळा आदर्श आणि अत्याधुनिक केल्या जाणार आहेत.

पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात असताना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यातील १२१ आश्रमशाळा आदर्श आणि अत्याधुनिक केल्या जाणार आहेत. डिजीटल शिक्षणाबरोबरच विविध प्रयोगशाळा सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 

राज्यात आदिवासी विभागाच्या ४९७ आश्रमशाळा आहेत. त्यापैकी विविध जिल्ह्यांतील १२१ शाळा आदर्श आणि आधुनिक करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. शाळा आदर्श करत असताना, दर्जेदार पायाभूत सुविधांबरोबरच आधुनिक शिक्षण सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये सुसज्ज इमारती, डिजिटल प्रयोगशाळा, सौरऊर्जेवरील यंत्रणा आदींचा समावेश आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये कौशल्य विकास, नवनिर्मितीसाठी विचार व्यवस्था, वैज्ञानिक प्रवृत्ती, कृतीयुक्त शिक्षण आदी शिक्षणाबरोबरच पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन, कला, क्रीडा आणि संगीत शिक्षणाचे देखील धडे दिले जाणार आहेत. 

पुण्यातील दहा आश्रमशाळांचा समावेश 
पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील प्रत्येकी ५ अशा एकूण १० आश्रमशाळांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, आहुपे, गोहे, तेरंगूण, राजपूर या पाच तर जुन्नर तालुक्यातील खिरेश्‍वर, अंजनावळे, सोनावळे, खटकाळे, सोमतवाडी या शाळांचा समावेश आहे. 


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यातील रिंग रोडच्या...पुणे : ‘‘महाराष्ट्र (एमएसआरडीसी) हाती घेण्यात...
नगर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणूकीत...नगर ः नगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या...
भंडारा जिल्ह्यात २७ लाख क्‍विंटल धान...भंडारा ः जिल्ह्यात आधारभूत केंद्राच्या माध्यमातून...
वाळु प्रकरणात साडेसोळा लाखांचा दंड वरुड, अमरावती : उपविभागीय अधिकारी यांनी जप्त...
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...