जळगाव जिल्ह्यात कृषी प्रकल्पांसाठी १२२ कोटी मंजूर

जळगाव जिल्ह्यात कृषी प्रकल्पांसाठी १२२ कोटी मंजूर
जळगाव जिल्ह्यात कृषी प्रकल्पांसाठी १२२ कोटी मंजूर

जळगाव : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ६१ गावांची निवड झाली आहे. प्रकल्पांतर्गत या गावांतील सूक्ष्म निरीक्षण करून वाहून जाणाऱ्या पाण्यावर काय प्रयोग करता येईल (मृद व जलसंधारण), शेतकऱ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सक्षमपणे कसा देता येईल, याचे सर्वेक्षण केले जाईल. सोबतच शेतीसह पूरक व्यवसायाला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १२२ कोटी ३२ लाख ५८ हजारांच्या प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली आहे.  

जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची बैठक झाली. त्यात वरील आराखड्यास मंजुरी देण्यात आली. अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्पाचे प्रकल्प विशेतज्ज्ञ संजय पवार आदी उपस्थित होते. 

या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात १२६ गावे, तर दुसऱ्या टप्प्यात २२९ गावांची निवड झाली. त्यापैकी ७७ गावामध्ये अगोदर हा प्रकल्प राबविली जाईल. वॉटर शेड ऑर्गनायझेशन संस्थेचे अधिकारी, कर्मचारी निवडलेल्या गावांमध्ये जाऊन काही दिवस मुक्काम करतील. गावांचे सूक्ष्म निरीक्षण करून पाणी वापराबाबतचे निरीक्षण करतील. वाया जाणाऱ्या पाण्यावर काय प्रयोग करता येतील, नवीन योजनांद्वारे पाणीवापराबाबत काही बदल करता येतील का, वैयक्तिक लाभाच्या योजनांतून शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे, किती जण अजून या योजनांचा फायदा घेण्यास इच्छुक आहेत, त्याद्वारे त्यांचा विकास कसा होईल, आदी बाबींचे निरीक्षण नोंदविले जाणार आहे.

गटशेतीसाठी सात गटांची निवड 

कृषी विभागांतर्गत गटशेती करण्यासाठी जिल्ह्यातील सात गटांची निवड करण्यात आली. त्यात भूमिपुत्र शेतकरी गट, तापी कृषी विज्ञान मंडळ, मुलुंद दत्त समूह, आदर्श शेतकरी कृषी मंडळ, वसुंधरा कृषी मंडळ, शिवसह्याद्री कृषी मंडळाची निवड झाली आहे. महिन्याभरात या गटांनी आपण काय प्रकल्प उभारणार आहोत, याचा अहवाल सादर करावयाचा आहे. त्यानंतर त्यांना साठ टक्के अनुदान शासन देईल. वीस टक्के त्यांनी स्वतः भागभांडवल भरावयाचे आहे, वीस टक्के कर्ज मिळेल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com