कोल्हापुरात १२४८ कोटींचे पीककर्ज वाटप

कोल्हापुरात १२४८ कोटींचे पीककर्ज वाटप
कोल्हापुरात १२४८ कोटींचे पीककर्ज वाटप

कोल्हापूर  : खरीप हंगामात पीककर्ज वितरणात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांचे काम समाधानकारक असून, आत्तापर्यंत १२४७ कोटी ७४ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

जिल्हा अग्रणी बॅंकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक श्री. सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. श्री. सुभेदार म्हणाले, की खरीप हंगामात आतापर्यंत ९० टक्के कर्ज वितरणाचे काम झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी १३८८ कोटी ३६ लाखांचे पीककर्जाचे उद्दिष्ट होते. मात्र, आत्तापर्यंत १२४७ कोटी ७४ लाखांचे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पीककर्जाचे उद्दिष्ट लवकरच १०० टक्के पूर्ण करावे. पीककर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सर्वाधिक म्हणजे ८६४ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तीन महिन्यांपूर्वी कर्ज वितरणामध्ये ८ टक्क्यांवर असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आघाडी घेतली असून, आत्तापर्यंत ३०४ कोटी २४ लाखांचे कर्ज वितरण केले आहे.

जिल्हा अग्रणी बॅंकेच्या वतीने २०१८-१९ साठीच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यातगत प्राथमिकता क्षेत्रासाठी ७६४७ कोटी ९७ लाख इतके उद्दिष्ट होते. जून २०१८ अखेर २४३७ कोटी ९१ लाखांचे अर्थसाह्य करण्यात आले आहे. याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यात ३० जून २०१८ पर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ११ लाख ५६ हजार ९१ खाती उघडण्यात आली असून, १० लाख ५२ हजार ४३ खात्यांमध्ये रू-पे कार्ड प्रदान करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सहायक महाप्रबंधक संजय बुऱ्हांडे, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, सहायक प्रकल्प संचालक श्री. जाधव यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि बॅंकांचे समन्वयक उपस्थित होते.

बॅंकांनी केलेले कर्जवाटप बॅंक ऑफ इंडिया ९४ कोटी १८ लाख, बॅंक आॅफ महाराष्ट्र ६० कोटी १३ लाख, स्टेट बॅंक ऑफ इंडिया ५० कोटी ७ लाख, बॅंक ऑफ बरोडा २३ कोटी २५ लाख, युनियन बॅंक ऑफ इंडिया २० कोटी ६ लाख, आयडीबीआय १२ कोटी ५४ लाख, आयसीआयसीआय २४ कोटी ७५ लाख, फेडरल बॅंक २३ कोटी ३७ लाख, रत्नाकर बॅंक १३ कोटी ६० लाख, कारर्पोरेशन बॅंक ९ कोटी ८८ लाख, कॅनरा बॅंक ६ कोटी २४ लाख, इंडियन ओवरसिज बॅंक ६ कोटी ५० लाख, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ३ कोटी ७ लाख, देना बॅंक ५ कोटी २१ लाख,  सिंडीकेट बॅंक २ कोटी ६१ लाख, युको बॅंक ३ कोटी ११ लाख, विजया बॅंक २ कोटी ६२ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक ७ कोटी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com