agriculture news in marathi, 1248 crore crop loan allocation in Kolhapur | Page 2 ||| Agrowon

कोल्हापुरात १२४८ कोटींचे पीककर्ज वाटप

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

कोल्हापूर  : खरीप हंगामात पीककर्ज वितरणात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांचे काम समाधानकारक असून, आत्तापर्यंत १२४७ कोटी ७४ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

कोल्हापूर  : खरीप हंगामात पीककर्ज वितरणात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांचे काम समाधानकारक असून, आत्तापर्यंत १२४७ कोटी ७४ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

जिल्हा अग्रणी बॅंकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक श्री. सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. श्री. सुभेदार म्हणाले, की खरीप हंगामात आतापर्यंत ९० टक्के कर्ज वितरणाचे काम झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी १३८८ कोटी ३६ लाखांचे पीककर्जाचे उद्दिष्ट होते. मात्र, आत्तापर्यंत १२४७ कोटी ७४ लाखांचे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पीककर्जाचे उद्दिष्ट लवकरच १०० टक्के पूर्ण करावे. पीककर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सर्वाधिक म्हणजे ८६४ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तीन महिन्यांपूर्वी कर्ज वितरणामध्ये ८ टक्क्यांवर असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आघाडी घेतली असून, आत्तापर्यंत ३०४ कोटी २४ लाखांचे कर्ज वितरण केले आहे.

जिल्हा अग्रणी बॅंकेच्या वतीने २०१८-१९ साठीच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यातगत प्राथमिकता क्षेत्रासाठी ७६४७ कोटी ९७ लाख इतके उद्दिष्ट होते. जून २०१८ अखेर २४३७ कोटी ९१ लाखांचे अर्थसाह्य करण्यात आले आहे. याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यात ३० जून २०१८ पर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ११ लाख ५६ हजार ९१ खाती उघडण्यात आली असून, १० लाख ५२ हजार ४३ खात्यांमध्ये रू-पे कार्ड प्रदान करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सहायक महाप्रबंधक संजय बुऱ्हांडे, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, सहायक प्रकल्प संचालक श्री. जाधव यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि बॅंकांचे समन्वयक उपस्थित होते.

बॅंकांनी केलेले कर्जवाटप
बॅंक ऑफ इंडिया ९४ कोटी १८ लाख, बॅंक आॅफ महाराष्ट्र ६० कोटी १३ लाख, स्टेट बॅंक ऑफ इंडिया ५० कोटी ७ लाख, बॅंक ऑफ बरोडा २३ कोटी २५ लाख, युनियन बॅंक ऑफ इंडिया २० कोटी ६ लाख, आयडीबीआय १२ कोटी ५४ लाख, आयसीआयसीआय २४ कोटी ७५ लाख, फेडरल बॅंक २३ कोटी ३७ लाख, रत्नाकर बॅंक १३ कोटी ६० लाख, कारर्पोरेशन बॅंक ९ कोटी ८८ लाख, कॅनरा बॅंक ६ कोटी २४ लाख, इंडियन ओवरसिज बॅंक ६ कोटी ५० लाख, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ३ कोटी ७ लाख, देना बॅंक ५ कोटी २१ लाख,  सिंडीकेट बॅंक २ कोटी ६१ लाख, युको बॅंक ३ कोटी ११ लाख, विजया बॅंक २ कोटी ६२ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक ७ कोटी.


इतर बातम्या
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
तलाठी हरवल्याची शेतकऱ्यांची तक्रारअमरावती: तिवसा तालुक्यातील अनकवाडी मालपूर...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
पीक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाची कास...औरंगाबाद ः यंदा मराठवाड्यात पाऊस नियमित आणि भरपूर...
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...