कर्जमाफी घोषणेनंतर १२५४ शेतकरी आत्महत्या

कर्जमाफी घोषणेनंतर १२५४ शेतकरी आत्महत्या
कर्जमाफी घोषणेनंतर १२५४ शेतकरी आत्महत्या

मुंबई : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर (जून ते ऑक्टोबर २०१७) पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १ हजार २५४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये निम्म्याहून जास्त अशा ६९१ घटना विदर्भातील आहेत. शेतीतील वाढती गुंतवणूक, शेतकरी कर्जमाफी आणि इतर विविध उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटतील हा राज्य सरकारचा दावा यामुळे फोल ठरला आहे.

राज्य सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर केली. योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांनाही योजनेत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करून तब्बल पाच महिने उलटून गेले आहेत. याकाळात शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. बँकांकडूनही स्वतंत्रपणे शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्यात आली. मोठा गाजावाजा करीत दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा झाली. पहिल्या टप्प्यात ८ लाख ४९० हजार शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट जाहीर करण्यात आली. पण, कर्जमाफीची ही प्रक्रिया ऑनलाइनच्या प्रचंड गोंधळात अडकली आहे. 

लाभाबाबत शेतकरी साशंक राज्य सरकारच्या कर्जमाफीतून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, दिवसेंदिवस जटील होत चाललेली कर्जमाफीची प्रक्रिया पाहून सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. याचे लाभ मिळतील याबद्दल शेतकरी आता साशंक बनले आहेत. त्यातच थकबाकीमुळे शेतकऱ्यांना खरिपात पीक कर्ज मिळाले नाही. आगामी रब्बी हंगामातील कर्ज वाटपावरही प्रश्नचिन्ह उभे आहे. शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांना खासगी सावकाराच्या दारात उभे राहावे लागते आहे. नोटबंदीच्या निर्णयापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला दरही मिळत नाही, अशी स्थिती आहे. सरकारकडून फक्त घोषणा होतात पण अंमलबजावणीच्या पातळीवर गोंधळाचे चित्र आहे. त्याचमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटतील हा दावाही फोल ठरला आहे. परिणामी कर्जमाफी जाहीर झाल्यापासूनच्या पाच महिन्यांत १ हजार २५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक म्हणजेच ६९१ आत्महत्या जून ते ऑक्टोबर २०१७ या काळात  विदर्भात झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com