परभणीत १२.६४ टक्के पेरणी

जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात बुधवार (ता. १६) पर्यंत ६५ हजार ३६४ हेक्टरवर (१२.६४ टक्के) पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे.
12.64 per cent sowing in Parbhani
12.64 per cent sowing in Parbhani

परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात बुधवार (ता. १६) पर्यंत ६५ हजार ३६४ हेक्टरवर (१२.६४ टक्के) पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. कपाशीची लागवड ४९ हजार ४४९ हेक्टरवर, तर सोयाबीनची पेरणी १२ हजार ५०० हेक्टरवर झाली आहे. गेल्या आठवड्यात लागवड केलेल्या कपाशी, सोयाबीन पिकांची उगवण झाल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख १७ हजार १४३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. मृग नक्षत्रात जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्यामुळे जमिनीत पेरणी योग्य ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड तसेच सोयाबीनची पेरणी केली आहे. 

बुधवार (ता. १६) पर्यंत कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार, कपाशीची १ लाख ८५ हजार ७२० पैकी ४९ हजार ४४९ हेक्टरवर (२६.६३ टक्के) लागवड झाली आहे. सोयाबीनची २ लाख १९ हजार २०२ पैकी १२ हजार ५०० हेक्टरवर (५.७० टक्के), तुरीची ५० हजार ६०८ हेक्टर पैकी २ हजार हेक्टरवर (३.९५ टक्के), मुगाची ३४ हजार पैकी १ हजार १०५ हेक्टरवर (३.२५ टक्के), उडदाची ११ हजार ६७६ पैकी १८० हेक्टरवर (१.५४ टक्का), ज्वारीची ९ हजार ९९५८ पैकी १०० हेक्टरवर (१ टक्का), बाजरीची १ हजार ७०० पैकी ३० हेक्टरवर (१.७६ टक्का), मक्याची १ हजार २२३ पैकी २४ हेक्टरवर (१.९६ टक्का) पेरणी झाली आहे. 

परभणी तालुक्यात ११ हजार ७८० हेक्टर, जिंतूरमध्ये ३ हजार ३३४ हेक्टर, सेलूमध्ये १८ हजार ६५५ हेक्टर, मानवतमध्ये ९ हजार ५४३ हेक्टर, पाथरीमध्ये ५ हजार ४०२ हेक्टर, सोनपेठमध्ये ६ हजार ८६० हेक्टर, गंगाखेडमध्ये ८०७ हेक्टर, पालममध्ये ४ हजार ४४३ हेक्टर, पूर्णा तालुक्यात ३ हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अनेक भागांत सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने जमीन वाफशावर नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. मोठ्या प्रमाणात तण उगवल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com