सोलापुरात १२७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

सोलापूर : ‘कोरोना’चे संशयित असलेल्या जिल्ह्यातील १२९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १२७ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दोन जणांचे अहवाल अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे सुदैवाने जिल्ह्यात ‘कोरोना’चे संकट तूर्त तरी नाही.
127 patients report negative in Solapur
127 patients report negative in Solapur

सोलापूर : ‘कोरोना’चे संशयित असलेल्या जिल्ह्यातील १२९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १२७ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दोन जणांचे अहवाल अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे सुदैवाने जिल्ह्यात ‘कोरोना’चे संकट तूर्त तरी नाही. असे असले तरी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी कडक सुरु केली आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी शहरापासून अगदी तालुका आणि गावपातळीपर्यंत कडकपणे राबवण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयासह विविध प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासनाच्या सर्व यंत्रणा या रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे संशयित आढळल्यास तातडीने त्यांना क्वरांटाईन करण्यात येत आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यात असे १२९ संशयित रुग्ण आढळले होते. तूर्त तरी एकही रुग्ण जिल्ह्यात नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात होम क्वरांटाइनमध्ये आजपर्यंत ४९० व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यांपैकी ३९५ लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. अद्यापही ९५ जण होम क्वरांटाइनमध्ये आहेत. इन्स्टिट्युशनल क्वारांटाइनमध्ये आतापर्यंत १९४ व्यक्ति होत्या. त्यांपैकी ६७ जणांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे अद्यापही १२७ जण इन्स्टिट्युशनल क्वारांटाइनमध्ये आहेत.    ५२ ठिकाणी स्थानिक निवारा केंद्रे 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५२ ठिकाणी स्थानिक निवारा केंद्रे उभारली आहेत. त्यामध्ये ३ हजार ८१२ लोकांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन हजार ८८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन हजार ६३० वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com