Agriculture news in Marathi 127 villages affected in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधित

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार पाच तालुक्यांतील १२७ गावे बाधित झाली आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला. तर लहान मोठी मिळून ९१ जनावरे दगावली आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता. ७) या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार पाच तालुक्यांतील १२७ गावे बाधित झाली आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला. तर लहान मोठी मिळून ९१ जनावरे दगावली आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी, दुधना, पूर्णा, गलाटी, लेंडी आदी नद्यांसह अनेक ओढे, नाले यांच्या पुराच्या पाण्यामुळे ९ पैकी ८ तालुक्यांतील हजारो हेक्टरवरील शेतीपिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु त्याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील २७ गावे, पाथरी तालुक्यातील ३०, गंगाखेड तालुक्यातील ४०, पालम तालुक्यातील १३, पूर्णा तालुक्यातील १७ अशी एकूण १२७ गावे बाधित झाली आहेत.

सायाळा (ता. गंगाखेड) आणि पोहंडूळ (ता.मानवत) येथील प्रत्येकी एका व्यक्तीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. पूर्णा तालुक्यातील ६१, गंगाखेड तालुक्यातील ७, पालम तालुक्यातील ४ असे एकूण ७२ लहान जनावरे दगावली. परभणी, पाथरी तालुक्यांतील प्रत्येकी १, गंगाखेड तालुक्यातील ८, पालम तालुक्यातील ९ असे एकूण १९ मोठे जनावरे दगावली आहेत. अंशतः पडझड झालेल्या घरांमध्ये 
गंगाखेड तालुक्यातील ६४२, पालम तालुक्यातील २६२, पूर्णा तालुक्यातील ११०, परभणी तालुक्यातील १५, सेलू तालुक्यातील ७, पाथरी तालुक्यातील २५ असा मिळून एकूण १ हजार ६१ घरांचा समावेश आहे.

 हिंगोलीत अतिवृष्टीचा नऊ हजार हेक्टरवरील पिकाला फटका
हिंगोली जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये मंगळवारी (ता. ७) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ८ हजार ९१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टिग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या संदर्भात पालकमंत्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संवाद साधून जिल्ह्यातील ३० मंडळांपैकी २० मंडळांतील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, पीक नुकसान, जीवित व वित्तहानी याबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, हळद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चार व्यक्ती पुरात वाहून गेलेले आहेत. बावीस घरांची पडझड झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील तीन गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...