Agriculture news in marathi 129 crore to banks for loan waiver for flood victims | Agrowon

सांगलीत पूरबाधितांच्या कर्जमाफीसाठी बॅंकांकडे १२९ कोटी रुपये वर्ग 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

सांगली ः जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पूर आला होता. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील १२९ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम विविध बॅंकांकडे पूर बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीसाठी वर्ग करण्यात आली आहे. 

सांगली ः जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पूर आला होता. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील १२९ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम विविध बॅंकांकडे पूर बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीसाठी वर्ग करण्यात आली आहे. 

गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये सांगली जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापूर यामुळे कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यातून दिलासा देण्यासाठी पूरबाधित शेतकऱ्यांसाठी एक हेक्‍टर पर्यंतची पीक कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील पूर पट्ट्यातील शेतकऱ्यांची यादी तयार केली होती. ही यादीची पडताळणी करून संबंधित विभागाने विभागीय पातळीवर प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्याला १३० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. 

दरम्यान, अनेक बॅंकांकडून पात्र खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने सदरच्या कर्जमाफीपासून शेतकरी वंचित होते. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत आढावा घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज खात्यावर रक्कम तात्काळ जमा करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी ज्या बॅंकांकडून खातेधारक शेतकऱ्यांच्या याद्या प्रलंबित होत्या त्यांचा पाठपुरावा करून याद्या उपलब्ध करून घेतल्या. त्यानुसार विविध बॅंकांकडे १२९ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी कृषी कर्जमाफीसाठी वर्ग करण्यात आला आहे. 

एक्‍सेस बॅंकेकडील पात्र खाते धारकांची यादी प्राप्त होताच उर्वरित रक्कम त्यांच्याही बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येईल. 
- निळकंठ करे, 
जिल्हा उपनिबंधक, सांगली 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...