agriculture news in Marathi 13 thousand birds died due to bird fliue Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जानेवारी 2021

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. राज्यात गुरुवारी (ता.२१) सुमारे ७०० पक्ष्यांचा मृत्यू झाला. 

पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. राज्यात गुरुवारी (ता.२१) सुमारे ७०० पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सुमारे ६०० कोंबड्यांचा समावेश आहे. राज्यात ८ जानेवारीपासून गुरुवार (ता.२१) अखेर सुमारे १३ हजार कोंबड्या आण पक्ष्यांच्या मृत्यू, तर ३८ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. 

दरम्यान, राज्यात बर्ड फ्लूच्या प्रभावित क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे. 

गुरुवारी (ता. २१) राज्यात ६२६ कोंबड्या, ३७ कावळे आणि ६९ इतर पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली आहे. तर सुमारे २ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती होती. 

भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्‍यातील मावंदा, रायता, सातारा जिल्ह्यांतील लोणंद तालुक्‍यातील मरीआईवाडी, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्‍यातील वरवटी, लातूर जिल्ह्यांत रेणापूर तालुक्‍यातील दावणगाव, नांदेड जिल्ह्यांत कंधार तालुक्‍यातील चिखली, किनवट तालुक्‍यात तलाहारी, नागपूर जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्‍यातील वारंगा आणि गडचिरोली येथील काही नमुन्यांचा समावेश आहे. पोल्ट्रीपासून एक किलोमीटर त्रिज्येच्या अंतरातील सर्व सुमारे ३८ हजार कोंबड्या, ३५ हजार अंडी आणि ५२ हजार किलो पशुखाद्य आजपर्यंत शास्त्रोक्‍त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहे. 

पथकाकडून आढावा 
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी चेन्नई येथील डॉ. तपनकुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. या पथकाने रायगड जिल्ह्यातील पेण, पुणे जिल्ह्यातील नांदे, दौंड तालुक्‍यातील बेरीबेल येथे आढावा घेतला. तसेच बुधवारी बीड आणि परभणी जिल्ह्यांत पाहणी केली. 
 


इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...