agriculture news in Marathi, 13 thousand scouts for boll worm observation, Maharashtra | Agrowon

बोंड अळीवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा १३ हजार 'स्काउट'
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे : राज्यात गेल्या खरिपात धुमाकूळ घालणारी बोंड अळी यंदा अकोल्याच्या तेल्हारा भागात दिसून आल्यामुळे कृषी विभाग सतर्क झाला आहे. यंदा २२ हजार गावांवर नजर ठेवण्यासाठी १३ हजार स्काउटचे जाळे तयार करण्यात आलेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : राज्यात गेल्या खरिपात धुमाकूळ घालणारी बोंड अळी यंदा अकोल्याच्या तेल्हारा भागात दिसून आल्यामुळे कृषी विभाग सतर्क झाला आहे. यंदा २२ हजार गावांवर नजर ठेवण्यासाठी १३ हजार स्काउटचे जाळे तयार करण्यात आलेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गेल्या हंगामात बोंड अळीने नुकसान झालेले शेतकरी अजूनही मदतीची वाट पहात आहेत. बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६८०० रुपये दिले जाणार आहेत. ‘‘बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १३५०० रुपये कमाल दोन हेक्टरपर्यंत मिळेल. मात्र, मदतीची किमान रक्कम एक हजारपेक्षा कमी असणार नाही,’’ असे राज्य शासनाने अलीकडेच पुन्हा स्पष्ट केले आहे. 

राज्यात २१ जुलैपर्यंत कपाशीखाली सरासरी ४१ लाख ९१ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा केलेला आहे. आतापर्यंत ३७ हजार हेक्टरवर पेरा झालेला असून, गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा ३९ लाखांच्या आसपास होता. गेल्या हंगामात धुमाकूळ घातलेल्या बोंड अळीमुळे यंदा पेरा कमी होण्याचा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने व्यक्त केला होता. 

‘‘कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) यंदा आम्ही नव्या स्वरूपात राबवित असून, आधीच्या ठेकेदार संस्थांना नव्याने ठेके देण्यात आलेले नाहीत. या ठेकेदारांकडून ८०० स्काउट नेमले जात होते. त्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले जात होते. मात्र, यंदा स्काउटची जबाबदारी १३ हजार ५०० कृषी कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. यामुळे २२ हजार गावांवरील कीडरोगावर नजर ठेवली जाईल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

राज्यातील २०४ कापूस उत्पादक तालुक्यांना स्काउटकडून निगराणीखाली ठेवले जाईल. पहिल्या टप्प्यात अकोटच्या तेल्हारा भागात गुलाबी बोंड अळी दिसून आली आहे. ‘‘गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी स्काउट मंडळी थेट गावात जाऊन प्लॉटवर नजर ठेवतील. त्याची नोंद आम्ही जीपीएसद्वारे ठेवणार आहोत. त्यामुळे शहरात बसून गावात पाहणी करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. संवेदनशील गावांमध्ये जास्त फेरोमन ट्रॅप लावले जाणार आहेत. या कामाची बिनचूक नोंद केली जाईल,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...