राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन भाजीपाला, फळांची थेट विक्री

शेतकऱ्यांचे हित कृषी विभागाने कायम जोपासले आहे. आपत्तीच्या काळात नुकसान होऊ नये यासाठी आमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन भाजीपाला आणि फळे विक्री व्यवस्था उभारली. त्यात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या सहभागी झाल्या. यानिमित्ताने थेट शेतकरी ते ग्राहक विक्री संकल्पनाही दृढ होत आहे. बंद काळात विक्री व्यवस्था उभारण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले. — सुहास दिवसे, कृषी आयुक्त
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन भाजीपाला, फळांची थेट विक्री
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन भाजीपाला, फळांची थेट विक्री

नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाल्याच्या विक्रीचा प्रश्न तयार झाला होता. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन फळे, भाजीपाला विक्री करण्यासाठी समन्वय साधला आणि शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांच्या सहभागाने आठ दिवसांत राज्यात सुमारे १३ हजार टन विक्री करण्यात आली. थेट विक्रीत अकोला, सांगली जिल्हा आघाडीवर आहे. विक्री होणाऱ्या भाजीपाला, फळे याबाबतचा दररोज कृषी आयुक्तालयातून आढावा घेतला जात आहे. शेतकरी गट, कंपन्यांकडून मोठ्या शहरात थेट विक्रीवर भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.  कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुढील काळातील धोका टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  त्यामुळे भाजीपाला, फळे विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली. विक्रीला तयार असलेला असलेला भाजीपाला, फळे जागेवर वाया जाण्याची भिती निर्माण झाली. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधला आणि भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी गट, शेतकरी कंपन्या यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला. वाहतूक करणाऱ्या वाहनाला परवाने देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून राज्यात भाजीपाला आणि फळाची सुरळीत विक्री सुरु आहे. गेल्या सहा दिवसांत दररोज सुमारे २ हजार टन फळांची आणि भाजीपाल्याची विक्री करता आली, असे नगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.  भाजीपाला विक्रीत अकोला, सांगली जिल्हा आघाडीवर आहे. राज्यभरातील प्रमुख शहरे, अपार्टमेंट अन्य मिळून सुमारे अडीच ते तीन हजार ठिकाणांवर भाजीपाला, फळांची विक्री होत आहे. पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आता मात्र दररोज सुमारे दोन हजार ते २२०० टन फळे, भाजीपाल्याची विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. या विक्रीसाठी राज्यात अडीच हजाराच्यावर शेतकरी गट, शेतकरी गटांचा सहभाग आहे. विक्री होत असलेल्या भाजीपाल्यात शेवगा, कोबी, सिमला मिरची, मेथी, टोमॅटो, बटाटे तर फळांत टरबूज, खरबूज, मोसंबी, संत्र्याचे प्रमाण अधिक आहे. कृषी आयुक्तालयातून दररोजच्या खरेदी-विक्रीचा आढावा घेतला जात आहे असे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

जिल्हानिहाय आठ दिवसांत झालेली विक्री (टनात) ठाणे ः ३०२, पालघर ः १९८, रायगड ः २८५, सिंधुदुर्ग ः ५४, रत्नागिरी ः ६४, कोल्हापुर ः २६८ सातारा ः ९६, सांगली ः २६३२, नाशिक ः ३०२, नंदुरबार ः ९९, धुळे ः १५८, जळगाव ः १६३, पुणे ः १००२, नगर ः ९१८, सोलापुर ः ११०९, औरंगाबाद ः ५४ बीड ः ६७, जालना ः ४२, लातूर ः १८०, उस्मानाबाद ः ६७, नांदेड ः ४३७, परभणी ः २२६, हिंगोली ः ५१, अमरावती  ः २५६, अकोला ः २३४७, बुलढाणा ः १९८, वाशिम ः ३२२, यवतमाळ ः २४२, नागपुर ः १२१, भंडारा ः २६१, गोंदिया ः ४४, चंद्रपुर ः ३७४, गडचिरोली ः ४५, वर्धा ः ५४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com