agriculture news in Marathi 13 thousand ton vegetable and fruits direct sale in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन भाजीपाला, फळांची थेट विक्री

सुर्यकांत नेटके
सोमवार, 6 एप्रिल 2020

शेतकऱ्यांचे हित कृषी विभागाने कायम जोपासले आहे. आपत्तीच्या काळात नुकसान होऊ नये यासाठी आमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन भाजीपाला आणि फळे विक्री व्यवस्था उभारली. त्यात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या सहभागी झाल्या. यानिमित्ताने थेट शेतकरी ते ग्राहक विक्री संकल्पनाही दृढ होत आहे. बंद काळात विक्री व्यवस्था उभारण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले.  
— सुहास दिवसे, कृषी आयुक्त

नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाल्याच्या विक्रीचा प्रश्न तयार झाला होता. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन फळे, भाजीपाला विक्री करण्यासाठी समन्वय साधला आणि शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांच्या सहभागाने आठ दिवसांत राज्यात सुमारे १३ हजार टन विक्री करण्यात आली. थेट विक्रीत अकोला, सांगली जिल्हा आघाडीवर आहे. विक्री होणाऱ्या भाजीपाला, फळे याबाबतचा दररोज कृषी आयुक्तालयातून आढावा घेतला जात आहे. शेतकरी गट, कंपन्यांकडून मोठ्या शहरात थेट विक्रीवर भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुढील काळातील धोका टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  त्यामुळे भाजीपाला, फळे विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली. विक्रीला तयार असलेला असलेला भाजीपाला, फळे जागेवर वाया जाण्याची भिती निर्माण झाली.

मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधला आणि भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी गट, शेतकरी कंपन्या यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला. वाहतूक करणाऱ्या वाहनाला परवाने देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून राज्यात भाजीपाला आणि फळाची सुरळीत विक्री सुरु आहे.

गेल्या सहा दिवसांत दररोज सुमारे २ हजार टन फळांची आणि भाजीपाल्याची विक्री करता आली, असे नगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
 भाजीपाला विक्रीत अकोला, सांगली जिल्हा आघाडीवर आहे. राज्यभरातील प्रमुख शहरे, अपार्टमेंट अन्य मिळून सुमारे अडीच ते तीन हजार ठिकाणांवर भाजीपाला, फळांची विक्री होत आहे.

पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आता मात्र दररोज सुमारे दोन हजार ते २२०० टन फळे, भाजीपाल्याची विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. या विक्रीसाठी राज्यात अडीच हजाराच्यावर शेतकरी गट, शेतकरी गटांचा सहभाग आहे. विक्री होत असलेल्या भाजीपाल्यात शेवगा, कोबी, सिमला मिरची, मेथी, टोमॅटो, बटाटे तर फळांत टरबूज, खरबूज, मोसंबी, संत्र्याचे प्रमाण अधिक आहे. कृषी आयुक्तालयातून दररोजच्या खरेदी-विक्रीचा आढावा घेतला जात आहे असे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

जिल्हानिहाय आठ दिवसांत झालेली विक्री (टनात)
ठाणे ः ३०२, पालघर ः १९८, रायगड ः २८५, सिंधुदुर्ग ः ५४, रत्नागिरी ः ६४, कोल्हापुर ः २६८ सातारा ः ९६, सांगली ः २६३२, नाशिक ः ३०२, नंदुरबार ः ९९, धुळे ः १५८, जळगाव ः १६३, पुणे ः १००२, नगर ः ९१८, सोलापुर ः ११०९, औरंगाबाद ः ५४ बीड ः ६७, जालना ः ४२, लातूर ः १८०, उस्मानाबाद ः ६७, नांदेड ः ४३७, परभणी ः २२६, हिंगोली ः ५१, अमरावती  ः २५६, अकोला ः २३४७, बुलढाणा ः १९८, वाशिम ः ३२२, यवतमाळ ः २४२, नागपुर ः १२१, भंडारा ः २६१, गोंदिया ः ४४, चंद्रपुर ः ३७४, गडचिरोली ः ४५, वर्धा ः ५४
 


इतर अॅग्रो विशेष
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...